शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?; खा. इम्तियाज जलील यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 08:13 IST

५ टक्के मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमनं आवाज उचलला आहे. त्यात सर्वपक्षीय मुस्लिमांनी सहभागी व्हावं. हा राजकीय मुद्दा नाही तर मुस्लीम समाजाचा मुद्दा आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

औरंगाबाद – मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटल्याचा आरोप करत एमआयएमची तिरंगा यात्रा मुंबईसाठी रवाना झाली आहे. पोलिसांचा दबाव आणून AIMIM ची रॅली अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदान बुक करायला गेलो तिथं शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जाऊन आयोजकांना धमकी देत कार्यक्रम रद्द करायला भाग पाडायचे. आमच्यावर अनेक निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला. मात्र चांदिवली येथील शाळेत सभेला परवानगी मिळाली आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सभा घेतील अशी माहिती औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

शनिवारी सकाळी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात तिरंगा रॅली औरंगाबादहून मुंबईसाठी रवाना झाली. यावेळी इम्तियाज जलील(MP Imtiyaj Jalil) म्हणाले की, मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असा आदेश पोलिसांनी दिला. हा आमच्या पक्षाचा झेंडा नाही. आमच्या स्वाभिमानाचा हा झेंडा आहे. महाराष्ट्राचा मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का? आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जातोय. मुस्लीम आरक्षणाबाबत काय करताय? वक्फ बोर्डाची ९३ हजार एकर जमिनी कोणी लाटल्या? सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी या जमिनी हडप केल्यात. हे प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय. भाजपा-शिवसेना काळात काँग्रेस-राष्ट्रवादी मुस्लीम आरक्षणावर इतकं भांडत होते. मुस्लिमांना आरक्षण का देत नाही असं काँग्रेस-राष्ट्रवादीवाले विचारत होते. मात्र आता हे सत्तेत आहेत त्यावर काहीच बोलायला तयार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच हा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. मुस्लीम समाजावर अन्याय झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांसह इतर पक्षातील सगळ्या मुस्लीम नेत्यांनाही निमंत्रण पाठवलं आहे. ५ टक्के मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमनं आवाज उचलला आहे. त्यात सर्वपक्षीय मुस्लिमांनी सहभागी व्हावं. हा राजकीय मुद्दा नाही तर मुस्लीम समाजाचा मुद्दा आहे असंही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

राज्यभरातून MIM कार्यकर्ते मुंबईत धडकणार

मुस्लीम आरक्षण( Muslim Reservation) आणि वक्फ बोर्डच्या प्रश्नावर एमआयएमची ( MIM ) तिरंगा यात्रा शनिवारी मुंबईत धडकणार आहे. या रॅलीत प्रत्येक वाहनावर तिरंगा असेल, शनिवारी पहाटे औरंगाबाद येथून अहमदनगर, पुणे मार्गे सर्वजण मुंबईला पोहचतील, तर राज्यातील अनेक जिल्ह्यातून वाहने थेट मुंबईत येतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील (MP Imtiyaj Jalil ) यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Muslimमुस्लीमImtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन