शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

MIMच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभेत राडा, 2 जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 13:14 IST

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' म्हणण्यावरुन वाद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

औरंगाबाद, दि. 19 - औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' म्हणण्यावरुन वाद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्याने मनपाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. 

औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात एमआयएमच्या नगसेकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं यावेळी शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले.  एमआयएमचे नगरसेवक व शिवसेना-भाजपाच्या नगरसेवकांमध्ये राडादेखील झाला.  तसेच एमआयएमचे नगरसेवक व युतीच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 

सर्वसाधारण सभेत नेमके काय घडले?

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ' वंदे मातरम्'  सुरू असताना बसून राहिलेल्या एमआयएम व काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना निलंबित करण्यासाठी शिवसेना व भाजपा यांनी आक्रमक पवित्रा घेत सभेत गोंधळ घातला. अखेर महापौरांनी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख या दोघांचे एक दिवसासाठी निलंबन केले आहे. 

'वंदे मातरम्' म्हणण्याला विरोध दर्शवण्यासाठी एमआयएमचे सय्यद मतीन व काँग्रेसचे सोहेल शेख हे नगरसेवक सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' सुरू असताना बसून राहिले होते. यावर शिवसेना व भाजप सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोन्ही नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी करत युतीच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. या गदारोळानंतर शेवटी महापौर भगवान घडामोडे यांनी सय्यद मतीन व सोहेल शेख या दोन्ही नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबित केले.

वंदे मातरम् कदापि म्हणणार नाही - अबू आझमी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रातही ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती करण्याच्या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले होते. ‘आम्हाला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, पण आम्ही कधीही वंदे मातरम म्हणणार नाही’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे.मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्रातही तशी सक्ती लागू करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी पत्रकारांना सांगितले होते.

यासंदर्भात आझमी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी विरोधी भूमिका घेतली होती. 'वंदे मातरम्'चा मी सन्मान करतो; मात्र माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे मी 'वंदे मातरम्' म्हणणार नाही. माझ्यावर कारवाई झाली, मला जेलमध्ये टाकले वा देशाबाहेर काढले तरी मी यावर ठाम असेन, असे आझमी म्हणाले. एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनीही आझमी यांच्या सुरात सूर मिसळला. माझ्या मानेवर सुरी ठेवली वा माझ्यावर गोळी झाडली तरी मी वंदे मातरम म्हणणार नाही, असे पठाण म्हणाले होते.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमBJPभाजपा