शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

...तर इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही; दसरा मेळाव्यात खा. प्रीतम मुंडेंचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 15:59 IST

तुम्ही प्रतिक आहात निष्ठेचं आणि ही निष्ठा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडत नाही. कोणत्या दबावापुढे कधीही झुकत नाही असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं.

बीड  - तुमची शक्ती आणि शिवशक्ती परिक्रमेनंतर ताई देवळातील ज्योतीप्रमाणे आपल्याला भासतात. या ज्योतीत पावित्र्य आणि निष्ठा आहे. दिलेला शब्द पाळण्याची ताकद आहे. त्या ज्योतीत निस्वार्थीपणे सेवा करण्याची भावना आहे. त्यामुळे पंकजाताईंच्या पराक्रमाची ज्योत आणि तुमची शक्ती एकत्र आल्यावर इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या. दसऱ्यानिमित्त सावरगावात दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं की, केवळ बीडच नव्हे तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातूनही लाखोंच्या संख्येने लोकं उपस्थित आहेत त्याबद्दल मी धन्यवाद करते. मला आजही आठवते, गोपीनाथ मुंडे भगवान गडावरुन दर्शन घेऊन घरी परतायचे. सीमोल्लंघन केल्यानंतर आम्ही त्यांना औक्षण करायचो. तेव्हा साहेब काहीतरी सोन्याची वस्तू ओवाळणी म्हणून द्यायचे. आज घरी परत गेल्यावर ओवाळण्यासाठी मुंडे साहेब नाहीत. पण त्यांनी दिलेली लाखो सोन्याची माणसं ही आमची मोठी संपत्ती आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत लोकं राजकारणात येऊन काय कमावतात? कुणी पदं, कुणी प्रतिष्ठा तर कुणी संपत्ती कमावतं, आम्ही काय कमावलं तर हा लाखोंचा जनसमुदाय कमावला. हीच आमची खरी संपत्ती आहे. पण हा जनसागर शांत नाही. निखारा आहे. प्रत्येक माणूस हा संघर्षाचा प्रतिक आहे. हा संघर्ष आहे वंचितांसाठी, गरिबांसाठी जो मुंडे साहेबांनी त्यांच्या ४० वर्षाच्या राजकारणात केला. त्यानंतर १० वर्ष संघर्ष पंकजाताई करतायेत. त्या संघर्षाला तुम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून सोबत दिली असंही प्रीतम मुंडें म्हणाल्या.

दरम्यान, तुम्ही प्रतिक आहात निष्ठेचं आणि ही निष्ठा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडत नाही. कोणत्या दबावापुढे कधीही झुकत नाही. तुम्ही प्रतिक आहात सबुरीचं, आपल्या लोकनेत्याच्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून अतिशय शांतपणे, ताईंच्या आदेशाची वाट बघणाऱ्या सबुरीचे प्रतिक आहे. भगवानबाबांनी आपला स्वाभिमान दिला, मुंडे साहेबांनी हा स्वाभिमान कधी आपल्याला कुणासमोर गहाण टाकू नाही दिला. आजकाल काहींना स्वत:च्या वाढदिवसाचे बॅनरही पदरचे पैसे खर्च करून लावावे लागतात. पण हा तुमचा स्वाभिमान आहे, ताईंवर संकट आल्यानंतर २ दिवसांत कोट्यवधी निधी गोळा करणारे तुम्ही आहात. तुमचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत अशा शब्दात प्रीतम मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.

टॅग्स :Pritam Mundeप्रीतम मुंडेDasaraदसरा