बनावट सोने देऊन लाखोंचा गंडा

By Admin | Updated: February 21, 2017 04:56 IST2017-02-21T04:56:33+5:302017-02-21T04:56:33+5:30

गूळ मार्केट परिसरात दरोड्यासाठी दबा धरून बसलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक

Millions of millions of money by making fake gold | बनावट सोने देऊन लाखोंचा गंडा

बनावट सोने देऊन लाखोंचा गंडा

लातूर : गूळ मार्केट परिसरात दरोड्यासाठी दबा धरून बसलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांना लातूरच्या न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लातुरात दोन ठिकाणी बनावट सोने देऊन काहींना लाखो रुपयांना गंडविल्याचे आरोपींनी चौकशीत कबूल केले आहे.
लातूर शहरातील बसवेश्वर चौकानजीक असलेल्या गूळ मार्केट परिसरातील राष्ट्रीय गुमास्ता मंडळ कार्यालयाच्या शेजारील संरक्षण भिंतीलगत काही जण दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. या आधारे पथाकने छापा टाकून परमेश्वर राजेंद्र गायकवाड (२३), नितीन शिवाजी जाधव (२७) आणि पांडुरंग तुकाराम जाधव (२२, सर्व रा. सोनवती ता. जि. लातूर) यांना अटक करण्यात आली. यातील अन्य दोन आरोप पसार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Millions of millions of money by making fake gold