शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दूध आणि खाद्यपदार्थांत भेसळ केल्यास दंड, आजन्म कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 03:14 IST

खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले.

मुंबई : खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले. फौजदारी कायद्याच्या १९७३ मधील पाच कलमांमध्ये त्यासाठी दुरुस्ती करण्यात आली आहे. असे करणारे महाराष्टÑ चौथे राज्य आहे.या दुरुस्तीमुळे भेसळ करणाऱ्याांवर वचक निर्माण होईल व गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र होतील. दुधामध्ये भेसळीची प्रकरणे समोर आली होती. भेसळयुक्त वा असुरक्षित अन्न वा बनावट औषधी द्रव्यांसंबधी ज्या गुन्ह्यांचा तपास लागला, त्यातील आरोपींना अटक करणे वा स्थानबद्ध करण्याची गरज असते. मात्र सध्या हे गुन्हे बिनदखली व जामीनपात्र असल्याने पोलीस, अन्न सुरक्षा अधिकारी व एफडीएच्या अधिकाºयांना गुन्ह्याच्या तपासात अडचणी येत होत्या.दुधातील पाण्याची भेसळ ही निकृष्ट दर्जात मोडते. त्यासाठी आजन्म कारावासाची शिक्षा नाही. त्यासाठी मूळ कायद्यानुसार शिक्षा होईल, असे बापट म्हणाले. नव्या दुरुस्तीनुसार दंड किती असेल हे स्पष्ट नाही असे, विचारता बापट म्हणाले, दंडाची रक्कम नियम करताना स्पष्ट केले जाईल.कठोर कायदा गरजेचाराज्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत एकूण ६०४ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले होते. त्यापैकी ३०२ प्राप्त अहवालामध्ये २१९ नमुने प्रमाणित घोषित झाले.तर ८३ नमुने कमी दर्जाचे होते. कमी दर्जाच्या नमुन्यांसंदर्भात कारवाई करण्यात येत असली तरी यासाठी कठोर कायद्याची गरज होती, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.

टॅग्स :milkदूधfoodअन्नMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा