शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:38 IST

Ready Reckoner: शहरांमधील रेडी रेकनरच्या झोननिहाय दरामुळे त्या झोनमधील मागास वस्त्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी महसूल विभागाने मायक्रो झोनिंगचा पर्याय शोधला असून, त्यामुळे एकाच झोनमधील विकसित व मागास वस्त्यांमधील जमीन व घरांच्या किमतीमधील तफावत दूर होणार आहे.

नागपूर - शहरांमधील रेडी रेकनरच्या झोननिहाय दरामुळे त्या झोनमधील मागास वस्त्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी महसूल विभागाने मायक्रो झोनिंगचा पर्याय शोधला असून, त्यामुळे एकाच झोनमधील विकसित व मागास वस्त्यांमधील जमीन व घरांच्या किमतीमधील तफावत दूर होणार आहे. महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. 

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. विजय दर्डा यांची मंत्री बावनकुळे यांनी नुकतीच भेट घेतली. यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यावेळी उपस्थित होते. रेडी रेकनरबाबत राज्यभर विशेष सर्वेक्षण सुरू आहे. मुंबईला यात प्राधान्य दिले जात आहे. त्यात झोन पद्धतीमुळे विकसित भागातील लहान घरे, झाेपडपट्टी, चाळींना मोठ्या इमारतींप्रमाणे वाढीव दर आकारला जातो. हे टाळण्यासाठी जीआयएस प्रणालीद्वारे मायक्रो झोनिंग करून व्हॅल्यू झोन ठरविला जाईल व नव्याने दर निश्चित केले जातील. झाेपडपट्टी, चाळी, औद्याेगिक, वाणिज्यिक, पुनर्विकास आदीसाठी स्वतंत्र दर ठरविण्याची प्रक्रिया महसूल यंत्रणा राबवित आहे. यामुळे विकसित भागातील मागास वस्त्यांवरील अन्याय दूर होईल, असे बावनकुळे म्हणाले. भूसंपादन प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल. गावनिहाय, प्लाॅटनिहाय रेडी रेकनरचे दर पीडीएफ स्वरूपात मिळू शकतील.

महसूल खात्यात निर्णयांचा धडाका; विद्यार्थ्यांना ५०० च्या स्टॅम्पची सक्ती रद्दराज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-२०२५ जाहीर. वाळू डेपाे पद्धत बंद, लिलाव पद्धतीने वाळूची विक्री, घरकुलांसाठी १० टक्के वाळू आरक्षित फेसलेस नोंदणी’ आणि ‘वन स्टेट, वन रजिस्ट्रेशन’ सुरू. राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी  ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’  सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यास धोरण विशेष अभय योजना‘जिवंत सातबारा’ मोहिमेतून शेतकऱ्यांना दिलासा : मयत खातेदारांच्या ५ लाख उताऱ्यांवर वारस नोंदी    ‘एम-सॅंड’चा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित शेत अन् पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोफत पोलिस बंदोबस्त    शेत रस्त्यांची होणार सातबारावर नोंद    जन्म-मृत्यूची बोगस प्रमाणपत्रे वितरणास चाप, जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात सुधारणा ड्रोनच्या माध्यमातून होणार खाणींची पाहणी आता घरबसल्या मिळविता येणारई-मुद्रांक प्रमाणपत्र  गाळ, माती, मुरूम विनामूल्य मिळणार घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार ! शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ, विद्यार्थ्यांना ५०० च्या स्टॅम्पची सक्ती रद्द    सलोखा योजनेला मुदतवाढ : शेतीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा माझी जमीन, माझा हक्क अभियानासाठी राज्यस्तरीय समिती ८० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या!. यंत्रणेचे विकेंद्रीकरण    महाराष्ट्रात शहरी भागांसाठी ‘नक्शा’ कार्यक्रमाला शासनाची मान्यता

‘महसूल’चे मोठे योगदान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा’ ही संकल्पना राबविली. त्यात महसूल व्यवस्थेने मोठे योगदान दिले. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा पाया रचला गेला. या शंभर दिवसात अनेक धाेरणात्मक निर्णय घेण्यात आले. यंत्रणेच्या बळकटीकरणाचा राेडमॅप तयार करण्यात आला. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार