शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:37 IST

७८ जागांवरील तिढा सोडविण्यावर खल, प्रत्येक विभागातील काही जागांचे वाटप आता शिल्लक असून घटस्थापनेपर्यंत त्या जागांचा तिढाही सोडवण्याचा मविआचा प्रयत्न आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीच्या सलग दोन दिवस झालेल्या बैठकीत जागावाटपाची चर्चा पुढच्या टप्प्यावर पोहोचली असून वाद असलेल्या काही जागांवर तोडगा निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १२ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर होणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मविआत २८८ पैकी २१० जागांचे वाटप आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उरलेल्या ७८ जागांवरील तिढा येत्या काही दिवसांत सोडवण्याचा तीनही पक्षांतील प्रमुख नेत्यांचा प्रयत्न आहे.

लोकसभेतही महाविकास आघाडीने महायुतीच्या आधी जागा वाटप करून आघाडी घेतली होती तर महायुतीचे जागावाटप शेवटच्या क्षणापर्यंत झाले नव्हते. त्याचा फटका महायुतीला बसला होता. विधानसभेलाही महायुतीच्या आधी जागावाटप जाहीर करून आघाडी घेण्याचा मविआचा प्रयत्न आहे. सोमवारच्या बैठकीत विदर्भातील १२ जागांचा तिढा असल्याचे समोर आले होते. विदर्भातील उद्धवसेना लढत असलेल्या पारंपरिक जागांवर काँग्रेसने दावा केला होता तर काँग्रेसची ताकद असलेल्या काही जागांवर उद्धव सेना आणि शरद पवार गटाने दावा केला होता. मंगळवारच्या बैठकीत यातील सहा जागांचा तिढा सुटल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रत्येक विभागातील काही जागांचे वाटप आता शिल्लक असून घटस्थापनेपर्यंत त्या जागांचा तिढाही सोडवण्याचा मविआचा प्रयत्न आहे. 

मविआत जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. प्रत्येक विभागातील राहिलेल्या दोन-चार जागांवर चर्चा सुरू आहे. घटस्थापनेला बहुतांश जागांचे वाटप पूर्ण होईल, तर दसऱ्याच्या मुहूर्तावर तीनही पक्ष जागा वाटप जाहीर करतील. दोन तृतीयांश जागांवर आमची आतापर्यंत सहमती झाली आहे. - जितेंद्र आव्हाड,  नेते, शरद पवार  गट

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४