शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मेट्रो हाऊसफुल !

By admin | Updated: June 9, 2014 02:29 IST

वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत, गगनचुंबी इमारतींना मागे टाकत रविवारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावली आणि लाखो मुंबईकरांनी जल्लोष केला

मुंबई : वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत, गगनचुंबी इमारतींना मागे टाकत रविवारी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो धावली आणि लाखो मुंबईकरांनी जल्लोष केला... सलामीलाच सुमारे दोन लाख प्रवाशांनी मेट्रोचा आनंद लुटला. रविवारच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या मेगाब्लॉकला कंटाळलेल्या प्रवाशांनी सुट्टीचा मुहूर्त साधत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने केलेल्या या कूल प्रवासाने मेट्रो रेल्वे अक्षरश: दणाणून गेली. मेट्रो राणीला आज खास फुलांनी सजविण्यात आले होते. वर्सोवा स्थानकावरही फुलांचा साज चढविण्यात आला होता. वर्सोवा स्थानकावर एमएमओपीएलसह एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. तर स्थानकावर प्रवेश देण्यात आला नसल्याने स्थानकाखाली मुंबईकर प्रवाशांचा मेट्रोच्या स्वागतासाठी जनसागर उसळला होता. मुंबईत पहिल्यांदा धावणाऱ्या मेट्रोचा साक्षीदार होण्यासाठी मुंबईकर हौसेने उपस्थित होते. रविवारच्या भल्या पहाटेच येथील गर्दीला महापूर आला होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीगणेशाची पूजा केली आणि १० वाजून २० मिनिटांच्या सुमारास मेट्रो पायलटच्या केबिनमध्ये प्रवेश करीत हिरवा झेंडा फडकाविला. या वेळी त्यांच्यासोबत अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानीही उपस्थित होत्या. मेट्रोचे पहिले पाऊल पडताच उपस्थितांनी मोरयाचा गजर केला. पुढच्या काही क्षणांतच मेट्रो रेल्वे घाटकोपरच्या दिशेने रवाना झाली. विशेष म्हणजे घाटकोपरकडे रवाना झालेल्या मेट्रोचे स्वागत करण्यासाठी येथेही प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. घाटकोपर स्थानकावर दाखल होणाऱ्या मेट्रोला पाहण्यासाठी मार्गाखाली उपस्थितांच्या माना उंचावत असल्याचे चित्र होते.