शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा मेसेज धडकला अन् पथक काेरेवाडीत पाेहाेचले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 08:30 IST

एकीकडे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वाडी, वस्ती अन् तांड्यावरही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे धड रस्ता आणि ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरले जात आहे.

संताेष मगर तामलवाडी (जि. उस्मानाबाद) :

एकीकडे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी वाडी, वस्ती अन् तांड्यावरही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, दुसरीकडे धड रस्ता आणि ओढ्यावर पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पाणी फेरले जात आहे. जीव मुठीत घेऊन ओढ्याच्या पाण्यातून मार्ग काढत यमगरवाडी येथील शाळा गाठावी लागत हाेती. हा प्रश्न ‘लाेकमत’ने रविवारच्या अंकात मांडला असता, त्याची थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दखल घेतली. सचिव श्रीकर परदेशी यांनी स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अन् हे पथक सकाळीच गावात दाखल झाले. थाेडाही विलंब न करता पथकाने अहवालही सादर केला आहे.  

तुळजापूर तालुक्यातील कोरेवाडीत चाैथीपर्यंतच शिक्षणाची साेय आहे. त्यामुळे पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना यमगरवाडी येथे जावे लागते. काेरेवाडी ते यमगरवाडी या दाेन्ही गावांमध्ये अवघे दाेन ते अडीच किलाेमीटर एवढेच अंतर आहे. परंतु, गावाला लागूनच भलामाेठा ओढा आहे. हा ओढा तलावाच्या पायथ्याशी असल्याने नेहमी पाणी असते. पाऊस पडल्यानंतर पूर येताे. अशा पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. ओढ्यावर पूल उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. परंतु, कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची ही जीवघेणी कसरत ‘लाेकमत’ने मांडली. या वृत्ताची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने घेतली. 

तातडीने दिला ९ पानी अहवाल : सचिव श्रीकर परदेशी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ‘लाेकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तासह मेसेज धाडत स्वतंत्र पथक पाठवून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हा आदेश धडकताच समग्र शिक्षण विभागाचे कार्यकारी अधिकारी आर. बी. राऊत, विस्तार अधिकारी मल्हारी माने यांचे पथक थेट गावात दाखल झाले. ग्रामस्थांसह पालकांना साेबत घेऊन ओढ्याच्या ठिकाणी गेले. तेथील परिस्थितीची पाहणी केली. थाेडाही विलंब न करता जवळपास ९ पानी अहवाल त्यांनी वरिष्ठांना सादर केला आहे. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद