शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘एसटी’ राज्य शासनात विलीन करा , महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 04:26 IST

एसटी महामंडळ हे स्वायत्त महामंडळ आहे. त्यामुळे महामंडळाला स्वत:चा खर्च स्वत:च करावा लागतो. सध्या महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसतर्फे करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी महामंडळ हे स्वायत्त महामंडळ आहे. त्यामुळे महामंडळाला स्वत:चा खर्च स्वत:च करावा लागतो. सध्या महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. यामुळे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसतर्फे करण्यात आली. राज्य शासनाचा एक विभाग म्हणून दर्जा दिल्यास एसटीचे सर्व प्रश्न निकालात निघतील, असा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात नुकतीच कामगारांसंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाई जगताप बोलत होते. महामंडळाकडे भांडवली अंशदान म्हणून केंद्र सरकारचे ५६ कोटी आणि राज्य सरकारचे ३५०० कोटी इतकी अल्प गुंतवणूक आहे. त्यामुळे महामंडळाला आर्थिक बळकटी मिळत नाही.याशिवाय महामंडळाचे अस्तित्व स्वतंत्र असल्यामुळे विविध कर महामंडळाला भरावे लागतात. प्रवासी करापोटी महामंडळाला वर्षाला अंदाजे ४०० कोटी रुपये शासनाला द्यावे लागतात तर डिझेलवर केंद्र शासनाचा अबकारी कर व राज्य शासनाचा विक्रीकर म्हणून ४५० ते ५०० कोटी वर्षाला भरावे लागतात. महामंडळाला दररोज १२ लाख लीटर डिझेल लागत असून वर्षाला ४२ कोटी लीटर डिझेल लागते. त्यावर केंद्र शासनाला प्रतिलीटर २९ रुपये व राज्य सरकारला २१ रुपये करापोटी द्यावे लागतात.टायर खरेदी व स्पेअर पार्ट्स खरेदीसाठीदेखील १८ टक्के जीएसटी लागत आहे. याशिवाय पथकरावरसुद्धा महामंडळाचे वर्षाला १२५ कोटी रुपये खर्च होतात. एसटीला शासकीय वाहन म्हणून दर्जा दिल्यास एसटीचा आर्थिक भार कमी होणार आहे. राज्य शासनाच्या वाहनांना इंधनावर तसेच इतर कर भरावे लागले तरी त्याचा परतावा मिळतो....तर वेतनप्रश्न सुटेलराज्य शासनाच्या परिवहन विभागात एसटीचा समावेश करावा. तसेच महामंडळातील कर्मचाºयांच्या वेतनवाढीची दर चार वर्षांनी होणारी करार पद्धती रद्द करून राज्य शासनाच्या कर्मचाºयांसारखे वेतन व भत्ते देण्यात यावेत. यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.रेल्वेच्या धर्तीवररेल्वेला मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने रेल्वेचे स्वतंत्र बजेट न ठेवता आपल्या बजेटमध्ये समाविष्ट केले आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाचे स्वतंत्र बजेट जाहीर न करता राज्य शासनाच्या बजेटमध्ये त्याचा समावेश करावा.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtraमहाराष्ट्र