शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेरा बेटा अब गोविंदा बनेगा: गोविंदांना नोकरीच्या आरक्षणावरून शिंदे सरकारवर ‘वॉर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 07:40 IST

राज्य शासनाने दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

जळगाव : 

राज्य शासनाने दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस आला असून, गोविंदांना नोकरीच्या आरक्षणावरून नेटिझन्सने शिंदे सरकारवर मीम्सद्वारे ‘वॉर’ सुरू केले आहेत. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा मुद्दा चांगलाच तापला असून, फेसबूकपासून ते ट्विटर, व्हॉटस्ॲपसह सर्वच सोशल साइटस्वर गोविंदा ट्रेडिंगवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करताना, नेटिझन्सने गंमतीशीर मीम्सचा वापर करून, सोशल मीडियावर हास्याचा फव्वाराच मारला आहे.

दहीहंडीमध्ये गोविंदा म्हणून सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारच्या खेळाडूंसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणाचा फायदा होणार आहे. अनेक विद्यार्थी संघटनांकडून या निर्णयाला विरोध होत आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. शिंदे सरकार स्थापन होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेक निर्णयांवरून शिंदे सरकार चर्चेत असून, काही निर्णयाचे स्वागत होत आहे, तर काही निर्णयाला विरोधाचा सामनादेखील करावा लागत आहे.

भन्नाट मीम्स जोमात, शिंदे सरकार कोमात

१. सरकारी नोकरी मिळण्यासाठी दोनच मार्ग, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे किंवा गोविंदा पथक जॉइन करणे.

२. सूरपारंबी खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असल्याचे म्हटले आहे.

३. मेरा बेटा गोविंदा बनेगा, असे म्हणत थ्री इडियटस् चित्रपटाचा एहसान कुरेशीचा फोटोच व्हायरल केला आहे.

४. तर काही नेटिझन्सनी दहीहंडीप्रमाणेच गोट्या खेळणाऱ्यांनाही शासकीय नोकरीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

५. काहींनी द ग्रेट खलीच्या जाहिरातीवरून मीम्स तयार करून आधी घरीच होतो, मात्र गोविंदा पथकात गेल्यानंतर सरकारी नोकरी मिळाल्याचा दावा केला. 

१५० वय झालेल्यांना ‘मंगळ’ ग्रहाचा प्रवास मोफतराज्य शासनाने ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ वय पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरदेखील नेटिझन्सने शिंदे सरकारची खिल्ली उडवली आहे. आता १०० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना विमानाचा प्रवास मोफत, १२५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना चंद्राचा प्रवास मोफत, तर १५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना थेट मंगळ ग्रहाचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय राज्य शासन घेणार असल्याचे मीम्स व्हायरल होत आहेत.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीSocial Viralसोशल व्हायरल