शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

वैद्यकीय शास्त्र अभ्यासक्रमातील कौमार्य चाचणीचा उल्लेख वगळला, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याला अखेर मिळाले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:35 IST

बलात्कारपीडित महिलांची कौमार्य चाचणी  वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जाते. ती कशी घ्यावी, याविषयीचा उल्लेखही वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमात होता.

नाशिक : बलात्कारपीडित महिलांची कौमार्य चाचणी  वैद्यकीय तज्ज्ञांकडून केली जाते. ती कशी घ्यावी, याविषयीचा उल्लेखही वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमात होता. हा विषय अखेर अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फिंगर टेस्ट’चा उल्लेख आहे. त्यानुसार बलात्कार पीडित स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासणी करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते. परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रीय असल्याचा  दावा करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे. कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते. पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नसल्याचा आक्षेप नोंदवित कौमार्यता हा खूपच वैयक्तिक विषय असून,  कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एका निवेदनाद्वारे हा विषय अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती. त्यावर  विद्यापीठाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पत्र पाठवून वरील निर्णय कळविला आहे.  

आता राष्ट्रीय स्तरावर लढाजातपंचायतकडून होत असलेल्या कौमार्य चाचणीवर अंनिसच्या पुढाकारामुळे बंदी घालण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी अंनिसने केली होती. आता राष्ट्रीय स्तरावर अस्तित्वात असलेल्या मेडिकल कौन्सिलच्या अभ्यासक्रमातून हा विषय काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अंनिसचे अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

टॅग्स :Medicalवैद्यकीय