शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

मेळघाटच्या ‘ग्रास मॅन’ने ३० व्याघ्र प्रकल्पांत फुलविले कुरण; ‘गवत असेल तरच वाघ वाचेल’ची संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 09:06 IST

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन; चिखलदरा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरणशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. गजानन मुरतकर असे या प्राध्यापकाचे नाव आहे.

नरेंद्र जावरे चिखलदरा (अमरावती) : जंगल असेल तर वाघ दिसेल, वाघासाठी आवश्यक असलेले तृणभक्षी प्राणी आणि त्या प्राण्यांसाठी अति आवश्यक असलेले कुरण अशा या अन्नसाखळीला तयार करण्यासाठी चिखलदरा येथील एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने एक-दोन नव्हे, तर १२ राज्यांतील ३० पेक्षा अधिक व्याघ्र प्रकल्पांत तृणभक्षी प्राण्यांसाठी  कुरणक्षेत्र तयार केले आहे. त्यामुळे पर्यावरणासह व्याघ्र संवर्धनात मोठी मदत झाली आहे. 

चिखलदरा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात पर्यावरणशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. गजानन मुरतकर असे या प्राध्यापकाचे नाव आहे. कुरणामुळे जमिनीची धूप, तापमान थांबण्यासह पाण्याचा निचरा होऊन कीटक, सरपटणाऱ्या प्राण्यांना नैसर्गिकरीत्या आश्रयस्थान, तृणभक्षी प्राण्यांना आवडते खाद्य व वाघ-बिबट्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांना जंगलातच शिकार मिळत असल्याने शहरात जाऊन मानव-वन्यजीव  संघर्ष थांबण्यास मदत झाली आहे. मुंगी ते हत्तीपर्यंत गवत अन्नसाखळीचा दुवा ठरले आहे. 

तृणभक्षी प्राण्यांत गवताच्या आवडीनिवडीमानवांमध्ये जेवणाच्या आवडीनिवडी आहेत, त्याप्रमाणे   चितळ, गवा, सांबर, अशा विविध तृणभक्षी प्राण्यांच्याही आवडीनिवडी आहे. काहींना मुलायम व कडक गवत आवडते. त्यानुसार चितळाला  मार्व्हल गवत हे रसगुल्लाप्रमाणे आवडते, तर गवा कुसळी व गोंधळी, सांबर गवत कमी व झाडांची पाने, फुले, फळे जास्त खातो. दूर्वा, पवन्या, रानतूर, रानमूग, रानसोयाबीन, बांबू, अशा विविध प्रजातींचे गवत आहेत. 

या राज्यांत गवती कुरण मध्यप्रदेश : कान्हा, सातपुडा, पन्ना, पेंच, बांधवगड. महाराष्ट्र : मेळघाट, सह्याद्री, पेंच, ताडोबा, नवेगाव, टिपेश्वर, नानज, भीमाशंकर, रहेकुरी. छत्तीसगड : अंचानकमार व इतर ४ अभयारण्यात. राजस्थान : रणथंबोर, मुकुंदराहिल्स.  कर्नाटक : बंदीपूर नागरहोले काली भद्रा बीआरटी. तामिळनाडू : के एम टी आर, ओरिसा : सिंमलीपाल सातखोशिया. तेलंगणा : कवल अमराबाद. बिहार : वाल्मिकी टायगर रिझर्व. उत्तराखंड : जिमकार्बेट आदी १२ राज्यांपेक्षा अधिक ठिकाणी त्यांनी कुरण तयार केले आहेत.

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प