शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात मेगाभरती; खुल्या किंवा ‘ईडब्ल्यूएस’तून एसईबीसीची पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 08:40 IST

मार्च २०१९ मध्ये मेगाभरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदांमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे भरण्यासाठीची ही जाहिरात होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करताना मराठा समाजासाठीच्या एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या वा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी याबाबतचा आदेश काढला.

मार्च २०१९ मध्ये मेगाभरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात जिल्हा परिषदांमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे भरण्यासाठीची ही जाहिरात होती. त्यासाठीची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाबाबतच्या अलीकडच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने हा नवा आदेश काढला आहे.

या आदेशानुसार, ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी पात्र असतील. एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून त्यांना संधी दिली जाईल. एसईबीसी आरक्षणामधून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी १ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ दरम्यान त्यांना त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात ठेवायचा आहे की, आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) प्रवर्गात याचा पर्याय देणे आवश्यक राहील. जे पर्याय देणार नाहीत ते खुल्या प्रवर्गात असल्याचे समजले जाईल.

उमेदवारांना लेखी परीक्षा ओळखपत्र १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन दिले जाईल. ७ ऑगस्ट २०२१ रोजी आरोग्य पर्यवेक्षक, औषधी निर्माण अधिकारी पदासाठी लेखी परीक्षा होईल. ८ ऑगस्ट २०२१ रोजी आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेवक महिला व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी लेखी परीक्षा होईल. ९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश दिले जातील.

दिव्यांगांसाठी ४ टक्केदिव्यांगांसाठीचे आरक्षण २०१६च्या कायद्यानुसार ३ टक्क्यांवरून ४ टक्के झालेले असल्याने सुधारित जाहिरात ही २९ किंवा ३० जून रोजी काढण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट पदांसाठी दिव्यांगांना १ जुलै ते २१ जुलै २०२१ दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील. 

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीHealthआरोग्य