शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सदावर्तेंच्या घरी सहा महिने झाल्या बैठका; पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:55 IST

सिल्व्हर ओक परिसरात घुसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दगड आणि चपलाफेक करीत हल्ला चढविला होता. गावदेवी पोलिसांनी या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आतापर्यंत ११६ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी अजित मगरे नावाच्या आरोपीला अटक केली.

मुंबई : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लोअर परळ येथील घराच्या गच्चीवर गेल्या ६ महिन्यांपासून बैठका सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या बैठका कशासाठी घेतल्या जात होत्या, यामध्ये बैठकांना नियमित उपस्थित राहणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.  सिल्व्हर ओक परिसरात घुसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दगड आणि चपलाफेक करीत हल्ला चढविला होता. गावदेवी पोलिसांनी या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आतापर्यंत ११६ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी अजित मगरे नावाच्या आरोपीला अटक केली. मगरे याचा हल्ल्याच्या कटात महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर अटकेत असलेला संदीप गोडबोले हा खास हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईत आला होता. तो सदावर्ते यांच्या निवासस्थानी ७ एप्रिलला झालेल्या हल्ल्यापूर्वीच्या बैठकीत हजर होता. त्याचा या गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग होता, तसेच त्याच्यासोबत अन्य काही व्यक्तीसह पाहिजे आरोपी जयश्री पाटीलदेखील होत्या. गोडबोले याच्याकडून मोबाइल जप्त करणे बाकी आहे. त्याचा अधिक तपास करण्यासाठी नागपूर येथे नेण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार, दोघांची कोठडी मिळताच, पोलीस अधिक तपास करीत आहे.  दुसरीकडे, कर्मचाऱ्यांकडून मी पैसे घेतले नाहीत. मात्र, सदावर्ते यांनी अर्ज तयार केले आणि पैसे गोळा करायला लावले. सदावर्ते आणि गोडबोले यात सहभागी आहेत, असे पाटील याने सांगितले, तर पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी यानेही आम्ही काही केले नाही. सर्व काही सदावर्ते यांनी केले. असे न्यायालयाला सांगितले होते.

सीसीटीव्हीची मदत- गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर बैठका सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. - सीसीटीव्हीच्या मदतीने बैठकांना नियमित हजेरी लावणाऱ्यांचा शोध सुरू आहे, तसेच यामागे आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारST Strikeएसटी संप