शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

संमेलनाध्यक्ष गणेश देवी की काळे?

By admin | Updated: September 24, 2016 02:36 IST

गालिबपासून ग्रेसपर्यंत अनेकांचे अंतरंग उलगडून दाखवणारे प्राध्यापक अक्षयकुमार काळे या दोन दिग्गजांची नावे डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आली

डोंबिवली : भाषांच्या सर्वेक्षणाचे काम करून बोलीभाषांना नवसंजीवनी देणारे प्राध्यापक गणेश देवी आणि कवितेच्या समीक्षेतून गालिबपासून ग्रेसपर्यंत अनेकांचे अंतरंग उलगडून दाखवणारे प्राध्यापक अक्षयकुमार काळे या दोन दिग्गजांची नावे डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत. गाढे समीक्षक म.सु. पाटील, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, प्रसिद्ध लेखक रवींद्र शोभणे यांच्याही नावांची चर्चा साहित्य परिषद आणि साहित्य संघाच्या विविध शाखांत सुरू आहे. या सर्वांचा परस्परांवर असलेला गाढ स्नेह आणि परस्परांच्या कामाबद्दल असलेला आदर पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असेही प्रयत्न सुरू आहेत.साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून डोंबिवलीचे नाव घोषित झाले. त्याबाबतचे अधिकृत पत्रही अजून आयोजक संस्था असलेल्या आगरी युथ फोरमला मिळालेले नाही. मात्र, अध्यक्षपदासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत म्हणजे अवघ्या २० दिवसांत नावे सुचवायची आहेत. त्यामुळे मतदानाचा अधिकार असलेल्या वेगवेगळ्या साहित्य संघांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चेचा गलबला सुरू झाला आहे. संमेलन डोंबिवलीत असल्याने तेथील साहित्यिक-सांस्कृतिक वातावरणाचा विचार करून मातब्बर व्यक्तीची निवड व्हावी, असे प्रयत्न सुरू आहेत. लोकभाषा, बोलीभाषांसाठी केलेल्या कामामुळे आणि आदिवासी अकादमीमुळे गणेश देवी यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे. अध्यक्ष होण्यास ते तयारही असल्याचे सांगितले जाते. पण त्यांना त्यासाठी निवडणूक लढवण्यात रस नाही; तर कवितेचे समीक्षक अशी ओळख निर्माण केलेले, त्यासाठीच्या व्यासंगामुळे सुपरिचित असलेले अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेले वर्षभर भरपूर तयारी केली आहे. त्यासाठी ते अनेक संस्थांच्या संपर्कात आहेत. लेखक रवींद्र शोभणे यांचीही निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितले जाते. विचारवंत रावसाहेब कसबे यांचेही नाव पुण्याच्या वर्तुळातून पुढे आले आहे. मुंबई-ठाण्याच्या वर्तुळातून ज्येष्ठ समीक्षक म.सु. पाटील यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, त्यांनी त्याबाबत स्वत:हून इच्छा असल्याबाबत काहीही जाहीर केलेले नाही. शिवाय, निवडणूक झालीच, तर त्यासाठीच्या प्रचाराची दगदग त्यांना कितपत सोसवेल, असाही पेच त्यांच्या हितचिंतकांपुढे आहे. या सर्वात गणेश देवी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीचे नाव स्पर्धेत आल्यामुळे साहित्य क्षेत्रातील अनेकांचा हुरूप वाढला आहे. त्यामुळे देवी आणि गेले वर्षभर तयारी करून आपला दावा भक्कम करणारे अक्षयकुमार काळे यांच्याच नावावर जोरदार चर्चा झडते आहे. पुढील आठवड्यात साधारण नवरात्रीच्या तोंडावर याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)>आयोजकांच्या इच्छेचाही होणार विचारसंमेलनाच्या आयोजक संस्थेला ८० मतांचा कोटा असतो. मतदारांच्या एकूणच हजारभर मतांच्या पसाऱ्यात त्या मतांचे स्थान अल्प आहे. त्यामुळे त्या मतांच्या जोरावर आयोजक संस्थेला आपल्या इच्छेनुसार अध्यक्षांची निवड करता येत नाही. परंतु, यंदाची आयोजक संस्था आगरी युथ फोरम असल्याने आगरीला बोलीभाषेच्या पटलावर आणणारे गणेश देवी आणि मुंबई-ठाणे पट्ट्यात वावर असल्याने म.सु. पाटील यांच्या नावांची चर्चा डोंबिवलीच्या साहित्यवर्तुळात आहे. त्यातील पाटील हे संमेलनाध्यक्षपदाच्या रिंगणात न उतरल्यास गणेश देवी यांच्या बाजूने आयोजकांचा कल असेल. त्यांनी साहित्य महामंडळाला त्यासाठी गळ घातली, तर महामंडळ त्यासाठी विविध शाखांशी संपर्क साधून त्यांचे मत वळवू शकते. त्यातही महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा देवी यांच्याशी स्नेह आहे. त्यामुळे तेही याबाबत पुढाकार घेत प्रयत्न करू शकतात. शिवाय, देवी यांच्यासारखे नाव पुढे आले, तर अक्षयकुमार काळे अध्यक्षपदासाठी वर्षभर थांबण्यास तयार होतील, असाही साहित्यवर्तुळाचा होरा आहे.>अक्षयकुमार काळे यांची साहित्यसंपदा सूक्तसंदर्भ, कविता कुसुमाग्रजांची, अर्वाचीन मराठी काव्यदर्शन, मर्ढेकरांची कविता-आकलन, आस्वाद आणि चिकित्सा, ग्रेसविषयी, प्रतितिविभ्रम, गालिबचे उर्दू काव्यविश्व-अर्थ आणि भाष्य हे समीक्षा ग्रंथ. गोविंदाग्रज-समीक्षक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज-व्यक्ती आणि वाङ्मय, सांप्रदायिक सद्भाव आणि शांतता हे संपादित ग्रंथ.>गणेश देवी यांची साहित्य संपदावानप्रस्थ (मराठी), आदिवासी जाणे छे (गुजराथी), आॅफ मेनी हीरोज (इंग्रजी), आफ्टर अ‍ॅम्नेसी (इंग्रजी), इंडिया बिटवीन ट्रॅडिशन अ‍ॅण्ड मॉडर्निटी (इंग्रजी), इंडियन लिटररी क्रिटिसिझम : थिअरी अ‍ॅण्ड इंटरप्रिटेशन (इंग्रजी), इन अनदर टंग (इंग्रजी), की वर्डज : ट्रूथ (इंग्रजी), क्रिटिकल थॉट (इंग्रजी), द जी. एन. देवी रीडर (इंग्रजी), ए नॉमॅड कॉल्ड थीफ (इंग्रजी), पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे आॅफ इंडिया, पेण्टेड वडर््ज : अ‍ॅन अ‍ॅन्थॉलॉजी आॅफ ट्रायबल लिटरेचर (इंग्रजी).>विदर्भावर बरेच काही अवलंबूनमहामंडळाचे कार्यालय विदर्भात गेल्याने राज्याच्या सत्तावर्तुळात विदर्भाला महत्त्व आल्याने संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीतही विदर्भाचा कौल महत्त्वाचा ठरेल, असा अंदाज आहे. संमेलनाचे स्थळ घोषित करताना पुणे आणि विदर्भातील संघर्ष समोर आला होता. तो टाळण्यासाठी अध्यक्षपद हे चांगले निमित्त आहे. विदर्भातून दरवर्षी एकगठ्ठा मतदान होते. छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या मतदानावरही विदर्भाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे अक्षयकुमार काळे यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे. शिवाय, त्यांनी बडोदा, आंध्र प्रदेशमधूनही जोर लावला आहे. मुंबई-पुण्यातही त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र, गणेश देवी यांचे नाव पुढे आल्यास हे चित्र बदलू शकते. पुणे-विदर्भाचे मनोमिलन होऊ शकते.>मतदानाचा अधिकार कोणाला? : संमेलनाध्यक्षपदासाठी १२ आॅक्टोबरपर्यंत नावे सुचवली जातील. त्यानंतर, गरज पडली तर मतदान होईल. तसे झाले, तर कोणाकोणाला मतदानाधिकार असेल, याचा धांडोळा-मसाप पुणे, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ यांना प्रत्येकी १४० मतांचा कोटा आहे. मसाप आंध्र प्रदेश, मसाप छत्तीसगढ, गुलबर्गा साहित्य संघ, गोमंतक साहित्य परिषद यांना प्रत्येकी ७५ मतांचा कोटा आहे. वाङ्मय परिषद बडोदा यांच्याकडे १०, महामंडळाच्या विश्वस्त निधीची पाच, हयात संमेलनाध्यक्षांची मते आणि आयोजक संस्थेला असलेला ८० मतांचा कोटा विचारात घेता साधारण हजारभर मतदारांतून अध्यक्ष निवडले जातात. यातील विदर्भात चर्चा-विनिमय करून एकगठ्ठा मते देण्याची परंपरा आहे. तेथील मतदान १०० टक्के होते. उरलेले मतदान उमेदवार, परिसर आणि त्या त्या वेळी उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर अवलंबून असते.