शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

पाहुण्यांशी जुळेना, ‘स्थानिक’ मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 02:12 IST

महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर विविध वॉर्डमधील प्रभागांमध्ये हालचालींना वेग आला.

मुंबई : महापालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर विविध वॉर्डमधील प्रभागांमध्ये हालचालींना वेग आला. सहज उपलब्ध असलेला, दांडगा जनसंपर्क आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करत असताना स्थानिकांचे ‘मत’ देखील विचारत घेतले जात आहे. परिणामी पाहुण्यांशी जुळेना, ‘स्थानिक’ मिळेना अशी काही अवस्था एल वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १७० मध्ये दिसून येत आहे.मुंबई शहराप्रमाणे चुनाभट्टीतही पाणी, रस्ता, सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मुळात आगरी-भंडारी लोकवस्तींचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. परिणामी आम्हाला सहज उपलब्ध असेल आणि आमच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी तत्पर असलेला स्थानिकच आमचा नगरसवेक असेल, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. परिणामी सत्ताधारी पक्ष सोडला तर अन्य राजकीय पक्षांना निवडून येणाऱ्या स्थानिक उमेदवाराची वानवा जाणवत आहे. प्रभाग क्रमांक १७० खुला असल्याने इच्छुकांची गर्दी आहे. त्यातही १७१ मध्ये महिला आरक्षण असल्याने विद्यमान नगरसेवक देखील १७० मधील संधीचे सोने करण्यासाठी उत्सुक असल्याचे सुत्रांनी सांगितले. परका उमेदवार देऊन स्थानिकांचा रोष ओढवत मतपेटीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करता स्थानिक ‘मिळता गडी मिळेना’ अशी अवस्था अन्य पक्षांची झाली आहे. (प्रतिनिधी)>इतिहासात डोकावतानाचुनाभट्टी येथे सुमारे ५० वर्षांपूर्वी मुळ आगरी वस्ती होती. पूर्वी येथे चुन्याची भट्टी चालत असे. यामुळे परिसराला ‘चुनाभट्टी’ नाव पडले. भट्टीचा परिसर सध्या नारायण नगर, खजुरीभट्टी म्हणून ओळखला जातो. स्वदेशी मिलमुळे परिसरात बदल झाला. रोजगार उपलब्ध झाल्याने शहरीकरणाला वेग आला. >अवघ्या १६७ मतांनी विजयप्रभाग क्रमांक १७० मध्ये विद्यमान नगरसेवक विजय तांडेल अपक्ष म्हणून ५६१४ मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अब्दूल रशिद मलिक यांना ५४४७ मते मिळाल्याने १६७ मताधिक्यांनी तांडेल यांचा विजय झाला होता.एल वॉर्डाचा नकाशा पाहता दक्षिणेस टोकाला प्रभाग १७०, १७१ आहे. व्ही.एन.पूरव मार्गामुळे चुनाभट्टी दोन प्रभागांत विभागली आहे. प्रभाग क्रमांक १७० मध्ये आगरी, भंडारी लोकवस्ती असून प्रभाग क्रमांक १७१ मध्ये मराठी, मुस्लिम अशी मिश्र स्वरुपाची लोकवस्ती आहे.