शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

मोटार वाहन कायद्याच्या भरपाईतून मेडिक्लेम वजा करता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 10:01 IST

Mumbai High Court News: मेडिक्लेम पॉलिसी किंवा वैद्यकीय विमा ही देयके करारांवर आधारित आहेत आणि अपघातग्रस्तांना देय असलेल्या कायदेशीर भरपाईमध्ये कपात करण्यासाठी वापरली जाऊ नयेत, असा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या न्या. ए. एस. चांदूरकर, न्या. मिलिंद जाधव आणि गौरी गोडसे यांच्या पूर्णपीठाने शुक्रवारी दिला. 

मुंबई -  मेडिक्लेम पॉलिसी किंवा वैद्यकीय विमा ही देयके करारांवर आधारित आहेत आणि अपघातग्रस्तांना देय असलेल्या कायदेशीर भरपाईमध्ये कपात करण्यासाठी वापरली जाऊ नयेत, असा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या न्या. ए. एस. चांदूरकर, न्या. मिलिंद जाधव आणि गौरी गोडसे यांच्या पूर्णपीठाने शुक्रवारी दिला. 

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी आणि डॉली सतीश गांधी यांच्यातील वादातून हा मुद्दा उपस्थित झाला. अपघातामुळे झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी डॉली गांधी यांना भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीला दिले होते. कंपनीने त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयने हा निकाल दिला. 

गांधींच्या वकिलाचा युक्तिवादवैद्यकीय विमा पॉलिसी ही विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यातील कराराची व्यवस्था आहे आणि एमव्ही कायद्यांतर्गत भरपाई वैधानिक आहे. एमव्ही कायद्याच्या कलम १६६ अंतर्गत भरपाईचा वैधानिक अधिकार विमा कंपनीसोबतच्या वेगळ्या कराराअंतर्गत दावेदाराला मिळणाऱ्या रकमेने कमी करता येणार नाही. 

कंपनीचा युक्तिवाददावेदाराला मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत वैद्यकीय खर्चाची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे अपघातप्रकरणी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेतून वैद्यकीय खर्चाच्या शीर्षकाखाली देण्यात येणारी रक्कम वजा करावी. एकाच अपघातासाठी दावेदाराला दोनदा भरपाई मिळू शकत नाही. एकदा विमा कंपनीने मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई केली की, दावेदाराला त्या खर्चाची आधीच भरपाई मिळाली आहे, असे समजण्यात येते. 

न्यायालय म्हणाले...जीवन विमा पॉलिसी किंवा इतर करारांतर्गत मिळालेल्या रकमा एमव्ही कायद्यांतर्गत भरपाईतून वजा केला जाऊ नयेत. एमव्ही कायद्यात न्याय्य भरपाई देण्याची तरतूद आहे आणि अशा भरपाईचा उद्देश हा आहे की,  जर अपघात झाला नसता तर दावेदार ज्या आर्थिक स्थितीत असता त्या आर्थिक स्थितीत अपघात झाल्यानंतरही दावेदाराला ठेवणे. विम्याची रक्कम एकप्रकारे विमा कंपनी आणि विमाधारकमधील करार आहे. विमा कंपनी मृत व्यक्तीच्या दूरदृष्टीचा फायदा घेऊ शकत नाही.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMumbaiमुंबई