शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागी ‘मविआ’ची सरशी, नागपुरात भाजपला, कोकणात मविआला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 07:38 IST

Vidhan Parishad Election: राज्यातील विधानपरिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आले आहेत.

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल पुढे आले आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघात समर्थित उमेदवाराच्या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, औरंगाबादेत राष्ट्रवादीने  आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले. कोकण शिक्षकची जागा भाजपने खेचून आणली.  अमरावती पदवीधरमध्ये भाजप पिछाडीवर आहे. डाॅ. रणजित पाटील यांच्या रद्द झालेल्या मतांची फेरमाेजणी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. 

पाचव्या फेरीनंतर सत्यजीत तांबे विजयीनाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीनंतर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे ६८,९९९ मतांसह विजयी झाले. मविआ पुरस्कृत शुभांगी पाटील यांना ३९,५३४ मते मिळाली. सत्यजीत तांबे यांचा तब्बल २९,४६५ इतक्या मताधिक्याने विजय झाला. या निवडणुकीत नाट्यमय राजकीय घडामाेडी घडल्या. 

नागपूर : मविआ समर्थित अडबाले विजयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडात भाजपसमर्थित उमेदवार नागो गाणार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी एकतर्फी मात दिली. अडबाले यांनी पहिल्या पसंतीची १६,७०० मते घेत विजयाचा कोटा पूर्ण केला. गाणार यांना ८,२११ मते मिळाली. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे ३,३५८ मते घेत तिसऱ्या स्थानी राहिले.

अंतिम फेरीअखेर काळे विजयीऔरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हे अंतिम फेरीअखेर ६,९३४ मतांनी विजयी झाले. काळे यांना २३,५५७ मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना १६,६६३ मते मिळाली.  मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव १४,१२८ मतांसह तिसऱ्या स्थानावर होते. रात्री उशिरा निकाल जाहीर झाला.

दृष्टिक्षेपात पदवीधर/शिक्षक मतदारसंघ निकालमतदारसंघ        भाजप+शिवसेना (बा.)/समर्थित     मविआ/समर्थित    अपक्ष    विजयीकोकण शिक्षक        ज्ञानेश्वर म्हात्रे (२०,०८३)    बाळाराम पाटील (१०,९९७)    धनाजी पाटील (१,४९०)     ज्ञानेश्वर म्हात्रेनागपूर शिक्षक        नागो गाणार (८,२११)    सुधाकर अडबाले (१६,७००)    राजेंद्र झाडे (३,३५८)    सुधाकर अडबालेमराठवाडा शिक्षक        किरण पाटील (१६,६६३)    विक्रम काळे (२३,५५७)    सूर्यकांत विश्वासराव (१४,१२८)    विक्रम काळेअमरावती पदवीधर         डॉ. रणजित पाटील (४१,०२७)    धीरज लिंगाडे (४३,३४०)    अनिल अमळकर (४,१८१)    लिंगाडे (आघाडीवर)नाशिक पदवीधर (सर्व अपक्ष)     सत्यजीत तांबे (६८,९९९)    शुभांगी पाटील (३९,५३४)    रतन बनसोडे (१,७१३)    सत्यजीत तांबे 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी