शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:43 AM

विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला.

धर्मपुरी (जि. सोलापूर) : विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा धर्मपुरी कालव्यावर पोहोचल्यावर जिल्हा प्रशासनाने केलेले जंगी स्वागत, बंदोबस्त व सुव्यवस्थेमुळे वारकरी भारावले. पालखी सोहळ्याचा नातेपुते येथे मुक्काम आहे.सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरील धर्मपुरी गावाजवळील कालव्यालगत प्रशासनाच्या वतीने शामियाना उभारण्यात आला होता. सकाळी संत ज्ञानेश्वर माऊलींचा नगारा पोहोचला. त्यापाठोपाठ माऊलींचे अश्व पोहोचले. रथापुढे चालणाऱ्या मानाच्या २७ दिंड्यांनंतर माऊलींचा रथ पोहोचला.सकाळी ६ वाजता बरड तळावरील मुक्कामानंतर सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. फलटण ते बरड हा संपूर्ण प्रवासही पावसाच्या धारा झेलतच झाला होता. तरीही वारकºयांचा उत्साह कायम होता. बरडहून प्रस्थानानंतर साधूबुवांचा ओढा येथे परंपरेनुसार सकाळचा विसावा झाला. त्यानंतर सोहळा सकाळी १० वाजता पुढेनिघाला.>तुकोबारायांच्या पालखीचे बावड्यात स्वागत शाहीबावडा (जि. पुणे) : ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात बावडानगरीत दुपारच्या विसाव्यासाठी दाखल झालेल्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराजांच्या पालखीचे मंगळवारी तोफांच्या सलामीत शाही स्वागत करण्यात आले.सोमवारचा इंदापूरचा मुक्काम आटोपून वडापुरी, रामवाडी, सुरवड, वकीलवस्ती आदी ठिकाणचा पाहुणचार घेऊन पालखी दुपारी तीन वाजता येथे दाखल झाली. ब्रह्मर्र्षी हरिभाऊ तोरणे गुरुजी चौकात पालखी येताच हजारो भक्तगणांनी दर्शन घेतले. सायंकाळी पाच वाजता पालखीचा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असणाºया सराटी गावाकडे प्रस्थान झाले.>भक्तनिवासात १२०३ भाविकांची सोयपंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे ७० कोटी रुपये खर्चून पंढरपुरात येणाºया भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज असे भक्तनिवास उभाण्यात आले आहे.आषाढी वारीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता होती, पण काही काम अपूर्ण आहे़>सोलापूरकर नतमस्तकसोलापूर : मागील ३३ दिवसांपासूनचा प्रवास करीत आलेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘गण गण गणात बोते़़़’चा जयघोष करीत उपलप मंगल कार्यालयात आगमन झाले़ उपलप कुटुंबाने प्रथेप्रमाणे पालखीचे स्वागत करून अन्नदानाची सेवा बजावली़>संत एकनाथ पालखीचे जिल्ह्यात स्वागतमाढा : पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराज पालखीचे मंगळवारी तालुक्यातील मुंगशीत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. तहसीलदार सदाशिव पडदुणे, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी यांनी पालखीचे दर्शन घेत स्वागत केले.>पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉचपंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यादरम्यान कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तत्काळ थांबवता यावा, यासाठी मंदिर व पोलीस प्रशासनाकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शहरात एकूण १५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ हेच सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण आषाढी वारी सोहळ्यावर लक्ष ठेवणार आहेत़

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा