सासवड : ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा दिवेघाटाची अवघड चढण पार करीत सोपानकाकांच्या नगरीत म्हणजेच सासवडमध्ये दाखल झाला. पुरंदरच्या ग्रामस्थांनी व भाविकांनी सोहळ्याचे हार्दिक स्वागत केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडहद्दीत चंदन टेकडीजवळ ठीक 6.3क्वा. दाखल झाला. सासवड नगर परिषदेच्या वतीने सत्कार झाल्यानंतर ठीक 7.15 वा. पालखी सोहळा सासवडच्या पालखीतळाच्या वळणावर आला. त्या ठिकाणी संत सोपानकाका बँकेच्या वतीने सत्कार झाल्यानंतर ठीक 7.3क् वा. पालखीतळावर विसावला. सोमवारी सकाळी पुण्यातून सासवडला निघालेला हा वैष्णवांचा मेळा सुमारे 35 कि.मी.चे अंतर व अवघड दिवे घाटाचा टप्पा पार करत संत सोपानकाकांच्या सासवड पुण्यनगरीत दोन दिवसांच्या मुक्कामासाठी क:हाकाठावर विसावला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारीसाठी विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपूरकडे निघालेला पालखी सोहळा अवघड दिवे घाटाची चढण लीलया पार करत संत सोपानकाकांच्या पुरंदर तालुक्यात विसावला. ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात, टाळमृदंगाच्या गजरात लाखो वारकरी आनंदात आपल्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीकडे वाटचाल करीत आहेत.
ठीक 4. 25 वाजता पालखी सोहळा दिवे घाटावर आल्यावर ङोंडेवाडीच्या विसाव्याच्या ठिकाणी विसावला. या वेळी आमदार विजय शिवतारे, माजी मंत्री दादा जाधवराव, चंदुकाका जगताप, तसेच पुरंदर पंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, पुरंदर-दौंडचे प्रांत समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी कविता चव्हाण, दिवे-ङोंडेवाडीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांसह पुरंदर तालुक्यातील हजारो भाविकांनी स्वागत केले.
घाट चढून आल्यावर अनेक वारक:यांनी घाटावरील मैदानात घटकाभर विश्रंती घेतली. या वेळी पुणो येथील योग विद्या धाम यांच्या वतीने वारक:यांना मोफत पायांचे मॉलिश करण्याची सोय उपलब्ध केली होती. त्याचप्रमाणो रस्त्यात अनेक ठिकाणी वारक:यांना चहा, केळी, उपवासाची खिचडी, आंबे, पपई , राजगिरा वडीचे वाटप सुरू होते. सासवड मार्गावरील काळेवाडी, दिवे, पवारवाडी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत झाले. तरुणांची संख्या लक्षणीय दिसत होती. या वर्षी चालू झालेल्या रस्तारुंदीकरणामुळे गर्दी जाणवली नाही. अभंग, ओव्या म्हणत वारकरी सासवडमध्ये दाखल होत होते. ग्यानबा -तुकारामच्या जयघोषात, टाळमृदंगाचा गजर आणि भगव्या पताका व महिलांच्या डोक्यावरील तुळशी वृंदावनांमुळे संपूर्ण रस्ता व परिसर भक्तिमय झाला होता.
चंदन टेकडीजवळ सासवडहद्दीत पालखीचा प्रवेश झाला, त्या वेळी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष नीलिमा चौखंडे, उपाध्यक्ष अजित जगताप, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, शिक्षण मंडळाचे सभापती यशवंतकाका जगताप यांसह नगरसेवक सुहास लांडगे, प्रमोद जगताप, वामनराव जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, योगेश गिरमे, डॉ. राजेश दळवी, संजयनाना जगताप, रोहित इनामके, नगरसेविका मीना वढणो, वसुधा आनंदे, ज्योती गायकवाड, प्रतिभा रणपिसे, शरयू शिंदे, सुचेता भोंगळे आणि सासवडकर नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. नगर परिषदेच्या वतीने दिंडी प्रमुखांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत होते. चंदन टेकडीजवळ आल्यावर वारकरी आपल्या गुंडाळलेल्या भगव्या पताका सोडतात, त्यामुळे एक नयनरम्य दृश्य दिसते.
सासवड शहरात आल्यावर पालखीतळाकडे वळताना संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने दिंडी प्रमुख व विणोकरी यांचा सत्कार बँकेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. सायंकाळी ठीक 7.3क्वाजता माऊलींची पालखी सासवडच्या पालखीतळावर दाखल झाली. या वेळी पालखीतळावर माऊलीनामाचा एकच जयघोष सुरू होता. सर्व वारकरी पालखीताळावर जमा झाल्यावर चोपदारांनी दंड वर करताच सर्वत्र शांतता झाली. त्यानंतर समाज आरती झाली. परवा सकाळी पालखी निघण्याची वेळ चोपदारांनी जाहीर केल्यावर वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन विसावले.
दिवे घाटात नयनरम्य सोहळ्यावर पुष्पवृष्टी
4सोमवारी दुपारनंतर वडकी नाला येथे विसावा घेऊन पालखी सोहळय़ाने दिवे घाटाची अवघड चढण चढण्यास सुरुवात केली. टाळमृदंगाच्या गजरात व माऊलीनामाच्या जयघोषात वारकरी उत्साहात उन्हाची पर्वा न करता घाटमार्ग लीलया पार करीत होते. त्यांच्या चेह:यावर थोडाही थकवा जाणवत नव्हता.
4घाटाच्या शेवटच्या टप्प्यावर माऊलींच्या पालखी रथावर उपस्थित
हजारो नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत हा नयनरम्य सोहळा आपल्या
डोळ्यांत साठवला.