शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

मौलाना आझाद सभागृहाची दुरवस्था

By admin | Updated: February 27, 2017 00:51 IST

महापालिकेने सन २००० मध्ये कोरेगाव पार्क येथे बांधलेल्या मौलाना अबुल कलाम सभागृहाची निगराणीअभावी दुरवस्था झाली आहे.

पुणे : महापालिकेने सन २००० मध्ये कोरेगाव पार्क येथे बांधलेल्या मौलाना अबुल कलाम सभागृहाची निगराणीअभावी दुरवस्था झाली आहे. उत्तम बांधकामाचा नमुना असलेली ही वास्तू वापराअभावी पडीक झाली असून, लक्ष दिले गेले नाही, तर थोड्याच कालावधीत ती वापरासाठी कायमची बंद होण्याची शक्यता आहे.येरवडा येथील पुलावरून पुणे शहराकडे येताना पूल ओलांडला की, लगेचच डाव्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याच्या अखेरीस ही वास्तू आहे. आकर्षक कमानी, त्यावर बारिक नक्षीकाम, आत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर दोन मोठी सभागृह व एका बाजूला मोठे कलादालन, भिंतीवर आतील व बाहेरच्या बाजूनेही चित्र लावण्यासाठी तयार केलेल्या फ्रेम्स अशी या वास्तूची रचना आहे. कमानींमुळे संपूर्ण वास्तूला वेगळाच कलात्मक बाज आला आहे. त्याशिवाय संपूर्ण वास्तूूच्या भोवती बागही केली आहे. त्याच्या भोवताली पुन्हा दाट वृक्षराजी आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी म्हणून ही वास्तू महापालिकेने बांधली; मात्र देखभालीअभावी तिची दुरवस्था झाली आहे. महापालिका निवडणुकीतील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील प्रभागांची मतमोजणी या वास्तूत झाली. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पहिल्या मजल्यावरील सभागृहाची स्वच्छता करण्यात आली होती; मात्र तरीही संपूर्ण वास्तूला आलेली अवकळा पहिल्या दृष्टिक्षेपातच लक्षात येत होती. सरकारी अधिकाऱ्यांसह बहुतेकांनी त्याबद्दल हळहळ व्यक्त केली.या परिसरात अनेक स्वयंसेवी संस्था, संघटनांचे कार्यक्रम होत असतात. त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या सभागृहाची आवश्यकता होती, त्यामुळेच महापालिकेने ते बांधले, मात्र आता त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे तेही बंद अवस्थेतच आहे. ते दुरुस्त करून वापरासाठी देण्याची गरज आहे, असे परिसरातील रहिवाशांचे मत आहे; मात्र वारंवार मागणी केल्यानंतरही त्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. (प्रतिनिधी) >दुरुस्तीसाठी महापालिकेकडे नाही वेळवास्तूच्या भोवताली तयार केलेल्या बागेकडे दुर्लक्ष झालेले दिसते. स्वच्छतागृहाला दारे नाही. वीजपुरवठा नाही. मतमोजणीसाठी म्हणून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणचा रंग निघाला आहे. सगळीकडे जाळीजळमटे आहेत. दुसऱ्या मजल्यावरील सभागृह; तसेच कलादालन कुलूप व त्यावर सील लावून बंद करण्यात आले आहे. त्याचा कधी वापरच होत नसल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. अनेक महिन्यांपासून संपूर्ण सभागृहच बंद आहे, महापालिकेकडे कार्यक्रमासाठी मागितले की, ते बंद असल्याचे सांगण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली. >सभागृहाचा वापर होत नाही ही वस्तुस्थिती आहे; मात्र त्याच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. ते काम सुरू असल्यामुळेच मागील ६ महिने सभागृह बंद ठेवण्यात आले आहे. मतमोजणी होणार असल्यामुळे ते काम थांबले. आता ते पुन्हा सुरू होईल. सभागृह कौटुंबिक कारणांसाठी मागण्यात येते. महापालिका नियमात तशी तरतूद नसल्यामुळे देता येत नाही. चर्चासत्र, परिसंवाद यासाठी ते देण्यात येईल. कलादालनाचा वापर सुरू करण्याचा प्रयत्न आाहे.- भारत कुमावत, व्यवस्थापक, महापालिका सांस्कृतिक सभागृह