शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘जलसंपदा’त पोहोचलेच नाहीत मॅटचे आदेश...! समन्वयासाठी जबाबदारी निश्चित करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 11:41 IST

Nagpur: विदर्भ पाटबंधारे महामंडळातील दोन अधीक्षक अभियंत्यांनी पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे दाखल केलेल्या याचिकेची मूळ पत्रे, मॅटच्या सूचना तब्बल चार महिने जलसंपदा मंत्रालयात पोहोचल्या नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली

नागपूर : विदर्भ पाटबंधारे महामंडळातील दोन अधीक्षक अभियंत्यांनी पदोन्नतीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादापुढे दाखल केलेल्या याचिकेची मूळ पत्रे, मॅटच्या सूचना तब्बल चार महिने जलसंपदा मंत्रालयात पोहोचल्या नसल्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, असे प्रकार पुन्हा असे घडू नये, यासाठी समन्वयाची जबाबदारी विशिष्ट अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. तसे आदेश राज्यातील सर्व पाटबंधारे महामंडळांना देण्यात आले आहेत. बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झालेल्या दोन अधीक्षक अभियंत्यांनी पदोन्नतीसाठी मॅटपुढे दाखल याचिकांची माहिती मंत्रालयात पोहोचू नये, असे डावपेच लढविले आणि त्यामुळे सरकारचे म्हणणे सादर न झाल्याने लवादाने तात्पुरत्या पदोन्नतीचा एकतर्फी आदेश दिल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले. यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना जलसंपदा उपसचिव उद्धव दहीफळे म्हणाले, याचिकेची ओरिजिनल प्रत मंत्रालयाला मिळालीच नाही. प्रत मिळाली तेव्हा हे प्रकरण ‘क्लोज फॉर ऑर्डर’ होऊन गेले होते. यावर विभागाने आता विधी व न्याय विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडे अपील केले आहे. अद्याप दोन्ही अधीक्षक अभियंत्यांना तात्पुरती पदोन्नती देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.  

याचिकांची माहिती वेळेत मिळण्यासाठी समन्वय अधिकारीप्रशासकीय लवादात किंवा न्यायालयात सुरू असलेल्या अशा याचिकांची वेळेत माहिती मिळावी, हाेणाऱ्या निर्णयांची प्रत वेळेत पोहोचावी यासाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर व कोकण महामंडळाच्या स्तरावर अधीक्षक अभियंत्यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. 

टॅग्स :Mantralayaमंत्रालय