माथेरान : माथेरानचा मुख्य रस्ता असलेला महात्मा गांधी मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्रीराम चौक परिसरातील आजूबाजूच्या काही स्वत:ला सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी हा भाग डंपिंग ग्राउंडच बनविला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना याचा त्रास होत असून यावर माथेरानमधील बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्रीराम चौकात नागरिकांसह पर्यटकांची वर्दळ असते. सायंकाळी खरेदीसाठी याच भागांत पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी पहावयास मिळते. परंतु या परिसरातील काही व्यापारी मंडळी प्लास्टीक कचरा, खाद्यपदार्थ येथील घोडा स्टॅण्डच्या बाजूलाच टाकतात. माथेरानमधील बहुतेक भागांतून नगरपरिषदेची घनकचरा गाडी नियमितपणे ओला ,सुका कचरा संकलन करण्यासाठी येत असते. तरीसुद्धा ही सुशिक्षित मंडळी भररस्त्यातच कचरा आणि खाद्यपदार्थ टाकत आहेत. तसेच रस्त्यावरून ड्रेनेजचे घाण पाणी देखील सोडलेले आहे. त्यातूनच नागरिकांसह पर्यटकांना मार्गक्र मण करावे लागते आहे. नगरपरिषदेने प्रत्येक जागी ‘कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यास ५० ते ५०० रु पये दंड आणि कारवाई करण्यात येईल’ अशा आशयाचे फलक लावलेले आहेत. तरीसुद्धा याकडे ही मंडळी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येथील रस्त्याला डंपिंग ग्राउंडाचे स्वरूप आले आहे. नगरपरिषदेने अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करूनच दंडात्मक वसुली करावा अशी मागणी होत आहे.रस्त्याचे झाले डंपिंग ग्राऊंडनगरपरिषदेने प्रत्येक जागी ‘कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यास ५० ते ५०० रु पये दंड आणि कारवाई करण्यात येईल’ अशा आशयाचे फलक लावलेले आहेत. तरीसुद्धा याकडे ही मंडळी दुर्लक्ष करत आहे. यामुळे रस्त्याला डंपिंग ग्राउंडाचे स्वरूप आले आहे. यामुळे येथून ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे
माथेरानच्या मुख्य रस्त्यावर कचरा!
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST