शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

माथेरान घाटात दरड कोसळली

By admin | Updated: July 4, 2016 02:58 IST

जोरदार पावसामुळे माथेरान घाटात रस्त्यावर जुमापट्टी परिसरातील मुख्य चढणीवर रविवारी सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली.

नेरळ : तीन दिवस सतत कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे माथेरान घाटात रस्त्यावर जुमापट्टी परिसरातील मुख्य चढणीवर रविवारी सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठमोठे दगड आणि लाल माती रस्त्यावर आली होती. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस, माथेरानचे पोलीस कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी व एमएमआरडीए ठेकेदार आणि टॅक्सी संघटनेच्या पुढाकाराने हा भराव बाजूला करण्यात आला. रस्त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्यास सुमारे तीन तासांचा कालावधी लागला.थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. माथेरानचे अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी व रस्त्यावर धबधबेही असल्याने मुंबई, पुण्यापासून पर्यटक माथेरानला येत आहेत. दोन दिवस शनिवार, रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी माथेरानला गर्दी केली होती. याच कालावधीत रविवारी सकाळी ही घटना घडली. त्यामुळे पर्यटक, प्रवाशांना व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे माथेरानच्या डोंगराळ भागाची जमीन भुसभुशीत झाल्याने दरड कोसळण्याची घटना घडली आहे. रस्त्यावर आलेला मातीचा भराव बाजूला करण्यास एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना सुमारे तीन तास लागले. एमएमआरडीएचे २० कर्मचारी, एक जेसीबी आणि एका डम्परच्या साहाय्याने हा भराव बाजूला करण्यात आल. यावेळी माथेरानचे पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक तडवी, पोलीस नाईक नरु टे तसेच नेरळचे वाहतूक पोलीस यावेळी उपस्थित होते. माथेरान घाट रस्त्यावर अनेक वेळा दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ही नागरखिंड परिसरात दरड कोसळली होती. यात दोन जण जखमी झाले होते. अशा घटना वेळोवेळी घडत असून पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एमएमआरडीएने कोणताही बोध घेतलेला नाही. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षक जाळी बसवावी, अशी मागणी पर्यटक व प्रवाशांकडून केली जात आहे. (वार्ताहर)>कुंडलिका नदीची वाढली पातळी रोहा : रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून रोह्याच्या कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलाडली आहे. शनिवारी दिवसभरात १८४ मिमी इतका पाऊस पडल्याने कुंडलिका नदीच्या सर्व उपनद्या व नाले पाण्याने दुथडी भरून वाहत होते. भिरा धरणातून पाण्याचा विसर्ग चालू करत असल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर रोहा अष्टमीला जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरील पुलावरून पाणी जाऊ लागले. त्याचा पहिला फटका सकाळच्या पुण्या -मुंबईकडे जाणाऱ्या एसटी सेवेवर झाला. पाण्याची पातळी वाढतानाच नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलावरूनही पाणी जाऊ लागल्याने अष्टमी व पलिकडील गावांचा पूर्णत: संपर्क तुटला. दुपारी दोनपर्यंत जुन्या पुलावर पाणी असल्याने दळणवळण पूर्णत: ठप्प झाले होते. >वीजवाहिनीवर पडले झाड पोलादपूर : शुक्रवारीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अतिदुर्गम भाग असलेल्या पळचील येथे एक झाड वीजवाहिनीवर पडले. त्यामुळे वाहिन्या असलेले वीजेचे खांबही वाकल्याने काही काळासाठी परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. >सावरीची वाडी येथे जवळच बुंध्याला गंजलेला एक जुनाट विद्युत खांब वादळात जमीनदोस्त झाल्याने आाजूबाजूचे विद्युत खांब वाकून सावरीची वाडी पळचिल रस्त्याच्या दुतफर् ा विद्युत वाहक तारा लोंबकळत रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे येथील जनतेच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. गेल्या ५० वर्षांपूर्वीचे वीजेच्या खांब वळोवेळी न बदलल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाकलेले पोल आणि शाळा परिसरातील विद्युत ट्रान्सफॉर्मर असणारे वाकलेले विद्युत पोल आता तरी वीज वितरण कंपनी बदलणार का? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाआहे.>घाट रस्ता पूर्ववतमाथेरान घाट रस्त्यावर शनिवारी दरड कोसळली हे कळताच नेरळ, माथेरानच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर एमएमआरडीएचे ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी घाट रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केली. माथेरान घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने लाल माती रस्त्यावर आली होती. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नसल्याने किमान अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी घाट रस्त्याच्या कडेला संरक्षक जाळी बसवावी.- अजय गायकवाड, पर्यटक