शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 07:29 IST

Matheran drown News: नवी मुंबईतून माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या १० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तिघे जण रविवारी संध्याकाळी शार्लोट लेक तलावात बुडाले.

नवी मुंबईतून माथेरानला पर्यटनासाठी आलेल्या १० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तिघे जण रविवारी संध्याकाळी शार्लोट लेक तलावात बुडाले. सह्याद्री आपत्कालीन बचाव पथकासह खोपोलीचे एक पथकही रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. सुमित चव्हाण (वय १६), आर्यन खोब्रागडे (वय १९) आणि फिरोज शेख (वय १९) अशी त्यांची नावे आहेत.

कोपरखैरणेतील महाविद्यालयीन तरुणाचा हा चमू माथेरानला पावसाळी पर्यटनासाठी आला होता. पिसरनाथ मंदिरात दर्शन घेऊन ते जवळच्या शार्लोट लेकवर गेले. तेथे तलावाच्या काठावर मौजमजा करता करता त्यांच्यापैकी एक तरुण पाय घसरून तलावात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी काहींनी तलावात उड्या घेतल्या. त्यापैकी दोघांनी बुडणाऱ्या तरुणाचा हात पकडला. मात्र त्याच्याबरोबर तेही बुडाले. 

रात्री उशिरापर्यंत बचाव पथकांकडून शोध सुरू इतरांनी या घटनेची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर माथेरान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी माथेरान सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीमला मदतीसाठी बोलावले.  बचाव पथक बुडालेल्या तरुणांचा  रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. त्यांच्या मदतीला खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक संस्था गुरूनाथ साठलेकर यांच्या पथकालाही पोलिसांनी मदतीसाठी पाचारण केले होते.

टॅग्स :Matheranमाथेरानdrowningपाण्यात बुडणेMaharashtraमहाराष्ट्र