शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी गणित कठीणच! आकलन क्षमता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 06:54 IST

विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते.

मुंबई : विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसलेला असो किंवा पाचवीला, त्याला सर्वात जास्त भीती कोणत्या विषयाची असेल किंवा तुला कोणता विषय जास्त अवघड वाटतो, असा प्रश्न विचारला, तर बहुतांश विद्यार्थ्यांचे हमखास उत्तर गणित हेच असते. नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील प्रगती इतर विषयांच्या तुलनेत अत्यंत खालावलेली असल्याचे समोर आले आहे. राज्यातील केवळ सरासरी ३३.५७ टक्के विद्यार्थी गणितात योग्य प्रकारे उत्तरे देऊ शकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी सगळ्यात कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती यातून समोर दिसून येते.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) शैक्षणिक सर्वेक्षण विभागाने देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेविषयी भाग-२ चे सर्वेक्षण (न्यास ) नुकतेच पूर्ण केले. त्यानुसार, प्रत्येक राज्याच्या जिल्ह्यांचे प्रगतिपुस्तक जारी केले आहे. यात हे प्रगतिपुस्तक प्रत्येक प्रकारच्या शाळेतील, गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान आणि नवीन भाषा या विषयांतील विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेवर आधारित आहे.या सर्वेक्षणानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांची गणित विषयातील कामगिरी अत्यंत कमी म्हणजेच ३३.५७% इतकी आहे. मुंबई उपनगरतील विद्यार्थ्यांची गणितातील कामगिरी २७.११% असून, मुंबईतील विद्यार्थ्यांची टक्केवारी ३५.२२% आहे. यामध्येही बीजगणितातील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३३.८२ % तर मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची कामगिरी अनुक्रमे २८.५७ % आणि ३६.३८ टक्के आहे.भूमितीतील राज्यातील विद्यार्थ्यांची कामगिरी ३७.२२ % इतकी आहे. मुंबई उपनगर व मुंबईतील विद्यार्थ्यांची भूमितीतील कामगिरी अनुक्रमे २९.६५ % आणि ४०.४१ % इतकी आहे. आकडेवारीमध्ये राज्यातील विद्यार्र्थ्यांची सरासरी कामगिरी ३०.५७ % इतकी आहे. २४.०४ % आणि २७.६० % ही कामगिरी मुंबई उपनगर व मुंबई शहरातील विद्यार्थ्यांची असल्याचे समोर आले आहे. संख्या प्रणाली, त्रिकोणमिती, संभाव्यता, समनव्य भूमिती यांची आकडेवारी या सर्वेक्षणातून समोर आली असून, कोणत्याच विषयांची सरासरी आकलन क्षमता ४५%च्या वर नसल्याचे समोर आले आहे. यावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांच्या आकलन क्षमतेच्या पातळीवर अवलंबून असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र