शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’सोबत ‘मस्त पुणे’चा क्रिकेट हंगामा

By admin | Updated: May 1, 2015 01:36 IST

मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये पदार्पण करून ‘लोकमत सी नेमा’ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘मस्त पुणे’ टीम दुसऱ्या सत्रासाठी सज्ज झाली

लोकमत- सारथी एंटरटेन्मेंटची ‘मस्त पुणे’ टीम : मराठी कलावंत उतरणार मैदानातपुणे : मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये पदार्पण करून ‘लोकमत सी नेमा’ने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘मस्त पुणे’ टीम दुसऱ्या सत्रासाठी सज्ज झाली असून, राज्यातील कोट्यवधी लोकमत वाचकांच्या शुभेच्छांनी आज ‘मस्त पुणे’च्या लोगाचे अनावरण झाले. मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकमत सी नेमा’ या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांमधील बंध क्रिकेटच्या निमित्ताने आणखी घट्ट करण्यासाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीगला ‘लोकमत’ची साथ लाभणार आहे. महाराष्ट्र कलानिधीच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये सारथी एंटरटेन्मेंट आणि ‘लोकमत सी नेमा’ची ‘मस्त पुणे’ टीम सहभागी होईल. महालक्ष्मी डेव्हलपर्सचे दत्तात्रय गोते-पाटील मुख्य प्रायोजक आहेत. गुरुवारी पुण्यात एका शानदार समारंभात ‘मस्त पुणे’च्या लोगोचे अनावरण झाले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, दिग्दर्शक अतुल जगदाळे, कार्तिक केंडे, अंकुर काकतकर, रमेश परदेशी, महालक्ष्मी डेव्हलपर्सचे दत्तात्रय गोते-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्यावर्षीपासून मी आणि नितीश राणे मिळून स्पर्धा आयोजित करीत आहोत. यंदाच्या स्पर्धा पाचगणी येथे ८ ते १० मे दरम्यान रंगणार आहेत. मस्त पुणे, शिलेदार ठाणे, कोहिनूर नागपूर, डॅशिंग मुंबई, रत्नागिरी टायगर्स, शूर कोल्हापूर, क्लासिक नाशिक, फटाका औरंगाबाद, धडाकेबाज नवी मुंबई, अजिंक्यतारा सातारा या टीम सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र कलानिधीचे सचिव आणि स्पर्धेचे संयोजक सुशांत शेलार यांनी सांगितले.कलावंतांना एकत्र आणून महाराष्ट्राची कीर्ती सर्वदूर पाहोचविण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा सर्वदूर फडकावण्यासाठी ‘लोकमत सी नेमा’अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘लोकमत’च्या सहभागाने एमबीसीएलला आणखी बळ प्राप्त होऊन स्पर्धेचा उद्देश सफल होईल. - ऋषी दर्डा, को-ओनर, मस्त पुणे संपादकीय संचालक, लोकमतसारथी एंटरटेन्मेंट आणि ‘लोकमत सी नेमा’ची ‘मस्त पुणे’ टीम एमबीसीएलमध्ये सहभागासाठी सज्ज झाली आहे. सर्व मराठी सेलिब्रिटी एकत्र येण्याचा हा एकमेव ‘इव्हेंट’ आहे. या निमित्ताने खेळाबरोबरच त्यांच्यातील संवाद वाढणार आहे. अनेक नवीन प्रोजेक्टना येथे चालना मिळेल. - पूनम शेंडे, को-ओनर, मस्त पुणे, संचालिका सारथी एंटरटेन्मेंटकलाकारांनी एकत्र येऊन स्पर्धेमध्ये सहभाग घेणे, ही कल्पना अत्यंत वेगळी आहे. ‘मस्त पुणे’ टीमबरोबर असल्याचा मला आनंद आहे. एकाच क्षेत्रातील मान्यवर एकत्र आल्याने त्यातून चांगली चर्चाही घडू शकते. कलाकारांना नवनिर्मितीला प्रेरणा मिळेल. - दत्तात्रय गोते-पाटील, संचालक, महालक्ष्मी डेव्हलपर्सटीम ‘मस्त पुणे’ हृषीकेश देशपांडे (कॅप्टन), अतुल गोगावले, उपेंद्र लिमये, मृण्मयी देशपांडे, तेजस्विनी पंडित, मृण्मयी गोडबोले, विजय पटवर्धन, प्रवीण तरडे, शशांक केतकर, कार्तिक केंदे, अंकुर काकतकर, रमेश परदेशी‘लोकमत’ आम्हाला ‘चिअर अप’ करण्यासाठी असल्याने या वेळी एमबीसीएलमध्ये खरोखरच खूप मजा येणार आहे. मला ज्या पुण्याने घडविले, त्या टीममधून खेळण्याचा आनंद वेगळाच आहे. आम्ही कसून प्रॅक्टिस सुरू केली आहे. सगळे प्लेअर अत्यंत उत्साहात आहेत. सगळे एकत्र येणार असल्याचाही आनंद आहे. - अतुल गोगावले, संगीतकारमी स्वत: खेळत नसलो, तरी स्वत:ला मस्त पुणे टीमचाच एक भाग मानतो. त्यामुळे स्पर्धेच्या दरम्यान तिन्ही दिवस पाचगणीला असणार आहे. खेळाडूंना चिअर अप करणार आहे. खेळाबरोबरच कलाकारांना परस्परांशी संवाद साधण्याची एक संधी म्हणून मी या स्पर्धेकडे पाहतो. यातून आमच्यातील मैत्री वाढण्यास आणखी मदत होणार आहे. - अजय गोगावले, संगीतकारयंदाचा संघही उत्तम आहे. सर्वजण शुटिंगमधून वेळ काढून मनापासून सरावाला यायचा प्रयत्न क रत आहेत. विशेष म्हणजे संघातील महिला खेळाडूदेखील मजा घेऊन खेळत आहेत. त्यांचा उत्तम सराव सुरू आहे. मागील वर्षी आम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो होतो. यंदा नव्या जोशाने आणि जोमाने तयारी सुर केली आहे. - ऋषीकेश देशपांडे अभिनेता ज्या शहरात घडले, त्या संघामधून खेळायचा खूप आनंद आहे. दररोज सकाळी एक्स्पटर््स आमच्याकडून सराव करून घेतात; त्यामुळे नवीन शिकायला मिळतेय, मजाही येतेय आणि व्यायामदेखील होत आहे. संघात सर्व उत्तम खेळाडू असल्याने स्ट्रॅटेजीवर विशेष लक्ष देत आहे. चांगला खेळ करून अंतिम सामना जिंकायचा नक्कीच प्रयत्न करू.- दीप्ती देवी, अभिनेत्रीशक्यतो मुली आणि खास करून सेलिब्रिटी क्रिकेट खेळण्याचे प्रमाण फार कमी आहे. मी ओपनिंग बॉलर असल्याचा मला जास्त आनंद आहे. याला एक हेल्दी स्पर्धा आणि गेट टुगेदर दोन्ही म्हणावेसे वाटते. हा जरी चार-पाच दिवसांत निपुण होण्याचा खेळ नसला, तरी आमच्या प्रयत्नांनी अंतिम फेरीत पोहोचू, अशी नक्कीच आशा आहे.- तेजस्विनी पंडित, अभिनेत्री या स्पर्धेमुळे मजा तर येतेच; पण त्याशिवाय काम करायलादेखील एक नवीन ऊर्जा मिळते. शूटिंगच्या वेळा अ‍ॅडजस्ट करून जमेल तसा सरावाला वेळ देत आहोत. मागील वर्षी अंतिम फेरीत पोहोचलो होतो. यंदाच्या वर्षी आम्ही भरपूर तयारी केली आहे. आमचे सर्व खेळाडू उत्साहात आहेत. त्यामुळे आम्ही जिंकणारच, हा विश्वास आहे. - विजय पटवर्धन, अभिनेता लोकमत पाठीशी असल्याने खूप मस्त वाटत आहे. लोकमतसारखा आधार असल्याने आमचा सराव, कामगिरी आणि बक्षिसे संपूर्ण राज्यात पोहोचू शकतील. तसेच, पुण्याच्या संघात भारतभर प्रसिद्ध अजय-अतुल गोगावले, आंतरराष्ट्रीय अ‍ॅवॉर्ड मिळवलेले उपेंद्र लिमये असल्याने गर्वच नव्हे, तर अभिमान आहे.- प्रवीण तरडे, लेखक-अभिनेता गेल्या वर्षी मी मस्त पुणे टीमकडून खेळलो होतो. मात्र, या वर्षी प्रॅक्टिससाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे खेळायचे नाही, असा निर्णय घेतला; पण ही टीम आणि सगळेच कलाकार माझे कुटुंबीय आहेत. त्यामुळे स्पर्धेचे तिन्ही दिवस मी उपस्थित राहणार आहे. खेळाडूंना चिअर अप करणार आहे. - जितेंद्र जोशी, अभिनेता