शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छता हीच सेवा मोहीम, स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 15:13 IST

स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत राज्य शासनाने स्वच्छता हीच सेवा ही मोहीम हाती घेतली आहे. १५ डिसेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

अमरावती, दि. 14 - स्वच्छ महाराष्ट्र साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत राज्य शासनाने स्वच्छता हीच सेवा ही मोहीम हाती घेतली आहे. १५ डिसेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्येही स्वच्छता हीच सेवा हा विषय घेऊन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर रानातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी करावी, असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे. १५ सप्टेंबरला स्वच्छता हीच सेवा या मोहिमेला औपचारिक सुरुवात होईल. १७ सप्टेंबरला सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत श्रमदान करून सेवा दिवस साजरा करण्यात येईल. २४ सप्टेंबरला समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करून समग्र स्वच्छता केली जाणार आहे.२५ सप्टेंबरला शहरातील हॉस्पिटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बसथांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची व्यापक सफाई करण्याचे वेळापत्रक नगरविकासने दिले आहे. त्यानंतर १ आॅक्टोबरला शहरातील प्रसिद्ध स्थळांची व्यापक स्वच्छता मोहीम राबविली जाईल.ओडीस्पॉटचे सौंदर्यीकरणजेथे यापूर्वी नागरिक उघड्यावर शौचास जात होते, ती ठिकाणे हागणदारीमुक्त झाली आहेत. त्याठिकाणांचे सुशोभिकरण मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. सोबतच २ आॅक्टोबरपर्यंत सर्वांना वैयक्तिक, सामुदायिक व सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे.जनआंदोलनाचे स्वरूप१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत नागरिक, इतर संस्था व घटकांनी शहरातील शक्य त्याठिकाणी दररोज श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी. जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ झाल्याचे दृश्य पहावयास मिळेल. याद्वारे शहरांमध्ये ख-या अर्थाने जनआंदोलन उभे राहू शकेल, असा आशावाद नगरविकास खात्याने व्यक्त केला आहे.