शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

मनसेचा राडा!

By admin | Updated: September 14, 2016 06:29 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला

मुंबई : विदर्भ राज्य आंदोलन समितीने मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे, संतोष धुरी, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काही काळासाठी पत्रकार परिषद बंद पाडली. स्वतंत्र विदर्भासाठी येत्या ३ व ४ आॅक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. विदर्भ राज्य आंदोलन समितीने नव्या वर्षात ‘करो या मरो’ आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत स्वतंत्र विदर्भाची स्थापना करावी, यासाठी अहिंसक पद्धतीने आंदोलन करणार, मात्र १ जानेवारीपासून थेट ‘देता की जाता, जनतेच्या लाथा खाता’ आंदोलन सुरू होईल. या वेळी लोक रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतील. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा समितीच्या कोअर कमिटीचे सदस्य अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मंगळवारी दिला. स्वतंत्र विदर्भाची मागणी करायची असेल तर विदर्भातच पत्रकार परिषद घ्यावी. अखंड महाराष्ट्रासाठी केलेले आंदोलन गैर नसून, मराठी जनतेची हीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. दरम्यान, आझाद मैदान पोलिसांनी मनसेची राड्याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. राज्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर पाहता, पुढील ५० वर्षांमध्ये तरी विदर्भाचा विकास अशक्य असल्याचा दावा कोअर कमिटी सदस्य डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केला. ते म्हणाले की, आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाणी, वने, खनिजे, वीज, कापूस आणि संत्री याबाबतीत विदर्भ अधिक समृद्ध आहे. मात्र राज्यातील इतर भागांचा बोजा विदर्भावर टाकला जात असून त्या बदल्यात विविध योजनांत विदर्भाला मागे ठेवले जात आहे. त्यामुळे केवळ आर्थिक शोषणासाठी विदर्भाचा वापर केला जात असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.विधानभवनावर दिंड्याविदर्भातील सिंदखेड, शेणगाव, कालेश्वर, उमरखेड आणि देवरी येथून नागपूर विधानभवनावर ५ डिसेंबर रोजी दिंड्या घेऊन धडकणार असल्याचे समितीने सांगितले. पोलीस जेथे अडवतील, तेथेच ठिय्या दिला जाईल. ३१ डिसेंबरपर्यंत सरकारने ठोस पाऊल उचलावे, म्हणून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले जाईल.‘देता की जाता’ आंदोलनसत्तेवर येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र सत्तेच्या सव्वादोन वर्षांनंतरही मागणी मान्य झालेली नाही. परिणामी ३१ डिसेंबरपर्यंत मागणी मान्य झाली नाही, तर १ जानेवारीपासून ‘देता की जाता, जनतेच्या लाथा खाता’ आंदोलन सुरू होईल. या वेळी लोक रस्त्यावर उतरून कायदा हातात घेतील. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, अशा इशाराही चटप यांनी यावेळी दिला.