शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 13:45 IST

शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना २ हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बीड : 'सरकारी काम आणि वर्षभर थांब' या उक्तीप्रमाणे प्रशासकीय दफ्तर दिरंगाईच्या बळी ठरलेल्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे. शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना २ हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जवान तुकाराम राख यांना १ मे २०१० रोजी 'ऑपरेशन रक्षक'मध्ये वीरमरण आले होते. त्यांनतर त्यांच्या पत्नी भाग्यश्री यांच्यावर समोर उदरनिर्वाह, लहान मुलीचे शिक्षणाच्या समस्या उभ्या राहिल्या आहे.

तर २०१८ मधील शासन निर्णयाप्रमाणे शहिदांच्या वारसांना २ हेक्टर जमीन देणे अभिप्रेत आहे. मात्र गेले अनेक दिवस शासकीय कार्यलयांच्या चकरा मारून व कागदपत्रांची पूर्तता करूनही आपल्याला जमीन मिळाली नाही, आपल्यावरील अन्याय दूर करावा असे निवेदन भाग्यश्री यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले होते. तसेच आठवड्याभरातच आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू असा इशाराही त्यांनी दिला होता.मुंडे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून भाग्यश्री राख यांना तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे वीरपत्नी भाग्यश्री राख यांना २ हेक्टर जमीन जमीन मिळणार आहे.