शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चैतन्याने फुलल्या बाजारपेठा, ग्राहकांची मनसोक्त खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 05:46 IST

राज्यात कोट्यवधींची उलाढाल; कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत आलेली सगळी मरगळ बाजूला सारून पुन्हा एकदा राज्यभरातील बाजारपेठा चैतन्याने फुलल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांत दिसून आले. दिवाळीच्या आधी आलेला रविवार तर खरेदीचा सुपर संडेच ठरला. कपडे, घरसजावटीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. कोरोनामुळे वाया गेलेल्या वर्षाची भरपाई करणारा सण-उत्साह बाजारपेठेत दिसल्याने व्यापाऱ्यांचीही दिवाळी यंदा ‘गोड’ ठरणार आहे.   

पुणे‘सोनियाचा दिनु’ कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. पुणेकरांचा इलेक्ट्रॉनिक मसाजर, वजन काट्यांच्या खरेदीकडे  ओढा दिसून आला. कपड्यांवर मॅचिंग ज्वेलरी हवी असल्याने बांगड्या,  ब्रेसलेट यासारख्या आर्टिफिशयल ज्वेलरीच्या खरेदीकडे महिलांचा कल होता. वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही, सोफासेट, ओव्हन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी झाली.

कोल्हापूर खरेदीसाठी महापूर कोल्हापुरात दिवाळीनिमित्त खरेदीला उधाण आले होते.  कपड्यांसह सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी झुंबड उडाल्याने अनेक ठिकाणी कोंडी झाली होती. रेडिमेड कपड्यांच्या दुकानात आकर्षक ऑफर देण्यात आल्या. आकाशकंदील, नियमित पणत्यांसह विद्युत पणत्यांना अधिक पसंती आहे. बालगोपाळ किल्ल्यांचे साहित्य खरेदीसाठी आग्रही दिसले.

औरंगाबाद कापड बाजारावर उड्या रविवार औरंगाबादकरांनी कापड खरेदी करून सार्थकी लावला. शहराच्या गुलमंडी, पैठणगेट, सिटीचौक, निराला बाजार, औरंगपुरा या बाजारपेठांसह गल्लीबोळातील दुकानांमध्येही झुंबड उडाली. कुंभारवाडा आणि रंगार गल्लीतही पाऊल ठेवण्यास जागा उरली नाही. साड्यांच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांना उसंत मिळाली नाही.

नागपूर   होम अप्लायन्सेसवर भरसर्वच बाजारपेठांमध्ये लोकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह होता. लोकांनी कपड्यांसह घर सजावटीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. लहान मुलांचे रेडिमेड कपडे, बेडशीट, गृह सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीवर लोकांचा भर होता. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शोरूम आणि दुकानांमध्ये होम अप्लायन्सेस, टीव्ही खरेदीसाठी गर्दी दिसून आली. 

मुंबई   कपडे खरेदीला पसंतीकपडे खरेदी करण्याकडे मुंबईकरांचा सर्वाधिक कल दिसून आला. कपड्यांव्यतिरिक्त सजावटीच्या साहित्यालाही मोठी मागणी आहे. विशेषत: आकाशकंदील, पणत्या आणि रांगोळीच्या साहित्याला मोठी मागणी आहे. एलईडी दिव्यांचे विविध प्रकारही बाजारात दाखल झाले आहेत. परंतु, त्यांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021