शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राख्यांनी बाजारपेठ फुलली; ऑनलाईन खरेदीमुळे छोट्या व्यावसायिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 17:17 IST

दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला बाजारात राख्या घेण्यासाठी महिला व युवतींची मोठी गर्दी होत असते.

भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शहरात राखीचे दुकाने थाटली असून मात्र ग्राहक ऑनलाईन खरेदी ला जास्त प्राधान्य देत असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांना याचा फटका बसत आहे. 

दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणाला बाजारात राख्या घेण्यासाठी महिला व युवतींची मोठी गर्दी होत असते. मात्र, ऑनलाईन पध्दतीने राख्यांची खरेदी जास्त होत असल्याने बाजारात ग्राहक कमी झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत राख्यांवर आपली उपजीविका भागवणाऱ्या छोट्या मोठ्या व्यवसायिकांवर संकट कोसळले असून त्यामूळे दुकानदार हतबल झाले असल्याचे दिसून येतं आहे. त्यामुळे राखी विक्रेत्यांनी आणलेले माल विक्री करायचा कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने बाजारातील वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे व्यापार करणे कठीण झाले आहे. 

छोट्या मोठ्या खेडेगावापासून लहान लहान शहरांपर्यंत अनेक ठिकाणी व्यापारी राखी पौर्णिमेच्या काही दिवसा अगोदर राख्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी लागत असतात. त्यामध्ये काही महिलांच्या संस्थेच्या वतीने तर मूकबधिर मुलांकडून तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून सुद्धा बाजारात राख्या विक्रीसाठी आणलेले असतात. मात्र, यावर्षी राख्यांची ऑनलाइन खरेदी वाढली असून लोकांनी ऑनलाईन पद्धतीने राख्या घेण्याचा कल नागरिकांचा वाढला आहे. त्यातूनच ऑनलाईन राखी घेताना त्यासोबत मिळणाऱ्या निरनिराळ्या गिफ्ट करिता ग्राहक सुद्धा आकर्षित होतात व साहजिकपणे याचा फटका खेडेगावात व शहरी भागातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना बसतो. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी राख्यांच्या किमतीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यामुळे सुद्धा नागरिकांनी राख्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनMaharashtraमहाराष्ट्र