शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मार्च महिन्यातच नदीचे पात्र झाले ‘ड्राय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:19 IST

शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात कोरडे पडल्याने शहरवासीयांना पुढील दोन महिने पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट : बंधारा बांधून वाढविला जलस्तर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यात कोरडे पडल्याने शहरवासीयांना पुढील दोन महिने पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढवून पाणी पुरवठा केला जात आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातंर्गत डांर्गोली येथे वैनगंगानदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना एप्रिल ते मे महिन्यादरम्यान पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावरील पुजारीटोला धरणातून कालव्याव्दारे पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यंदा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र ड्राय झाल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाला वैनगंगा नदीच्या पात्रात बंधार तयार करुन विहिरीची पाणी पातळी वाढविण्याची वेळ आली. बंधारा तयार केल्यामुळे किमान महिनाभर पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. मात्र तापमान वाढल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुजारीटोला धरणातून कालव्याच्या माध्यमातून पाणी आणून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी नहराची दुरूस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच हे काम सुरू करण्याची गरज आहे.गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाणी आणण्याची गरज पडणार आहे. त्यादृष्टीकानोतून नियोजन करण्यात आले आहे. सध्या वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्यात आली आहे.- राजेंद्र मडके, उपविभागीय अभियंता मजीप्रा.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई