शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘नो एंट्री’विरोधात वाहतूकदार जाणार संपावर, १२ मार्चला एक दिवसीय बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:18 IST

 मुंबई शहरात दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणा-या वाहतूक विभागाच्या विरोधात, महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मोटर मालक संघ यांनी १२ मार्चला ‘एक दिवसीय आराम’ आंदोलनाची हाक दिली आहे.

मुंबई -  मुंबई शहरात दिवसभर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणा-या वाहतूक विभागाच्या विरोधात, महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मोटर मालक संघ यांनी १२ मार्चला ‘एक दिवसीय आराम’ आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यासह कळंबोली आणि न्हावाशेवा येथील अवजड आणि माल वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. शिवाय अधिवेशन काळात वाहतूकदारांच्या समस्यांवर निर्णय जाहीर झाला नाही, तर २५ एप्रिलपासून राज्यातील सर्वच वाहतूकदार बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोहिंदर सिंग घुरा यांनी दिला आहे.मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत वाहतूकदारांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. या वेळी घुरा म्हणाले की, दक्षिण मुंबईतील माल वाहतूक वाहनांवर दिवसा लादलेल्या प्रवेश बंदीच्या वेळेविरोधात, वाहतूकदारांच्या संघटनांनी कर्नाक बंदरमध्ये गुरुवारी निषेध सभेचे आयोजन केले होते. त्यानंतर, हा निर्णय घेण्यात आला आहे.वाहतूक विभागाने निर्णयाचा फेरविचार करावा, अशी संघटनेची मागणी आहे.बंदी अयोग्यतूर्तास वाहतूक विभागाने मुंबई शहरात सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांवर प्रवेशबंदी लादली आहे, तर माल व प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना दक्षिण मुंबईमध्ये सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी अयोग्य असून, ती तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. मुळात अशा प्रकारची बंदी राज्यात कोणत्याही शहरात नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.३० टक्के नुकसान : वाहतूककोंडी होणाºया वेळेत अवजड वाहनांना रस्त्यावर बंदी आहे. मात्र, त्यात वाढ केल्याने केवळ रात्रीच्या वेळी मालाची चढ-उतार करणे अव्यवहार्य आहे. प्रवेशबंदीच्या निर्णयाने मुंबईला मोठ्या महसुलाला मुकावे लागत असून, सरासरी ३० टक्के धंदा कमी झाल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे येथील गोदाम बंद होऊन, हा व्यवसाय गुजरातच्या दिशेने जाण्याची भीती आहे. त्यामुळे येथील बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यताही संघटनेने व्यक्त केली. वाहतूकदारांहून अधिक मुंबई आणि पर्यायाने राज्याचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने या प्रकरणी लक्ष देण्याचे आवाहन संघटनेने केले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या