शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे...!

By admin | Updated: May 5, 2017 15:39 IST

‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे देहदान आणि अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला जात आहे. एका व्यक्तीच्या देहदानामुळे उद्याचे शेकडो

ऑनलाइन लोकमत/संतोष हिरेमठ 
 
औरंगाबाद, दि.05 -  ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे देहदान आणि अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला जात आहे.  एका व्यक्तीच्या देहदानामुळे उद्याचे शेकडो डॉक्टर घडत आहेत. तर एका ब्रेन डेड व्यक्तीचे हृदय, यकृत, किडनी, डोळे या अवयवांच्या दानामुळे किमान सहा व्यक्तींना नवीन आयुष्य मिळते. विविध माध्यमातून होणाºया जनजागृतीमुळे मराठवाड्यात रक्तदान, नेत्रदानाबरोबर देहदान आणि अवयवदानात वाढ होत असून ही संककल्पना समाजात हळूहळू रुजी लागली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) येथे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला किमान २० मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती होण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. देहदानाविषयी अंधश्रद्धा दूर करून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि देहदान करणाºया व्यक्तींना मदत करण्यासाठी एक समिती कार्यरत आहे. परिणामी, मागील काही वर्षांत देहदानाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते.
मानवी अवयवांचे दान करून आणि अशा दान केलेल्या अवयवांचे प्रत्यारोपण करून दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. त्यामुळे रुग्णाचा मेंदू कार्यरत नसेल तर त्याला मृत घोषित करून कुटुंबियांच्या परवानगीने  देता येणारे अवयवदान देऊन काही व्यक्तींना जीवदान आणि नवसंजीवनी देऊ शकतो. 
 
तीन वर्षात ४८ देहदान
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(घाटी) शरीररचनाशास्त्र विभागामध्ये देहदानाचे प्रमाण वाढत असून पाच वर्षापूर्वी वर्षभरात ८ ते १० मृतदेहांचे दान केले जात होते. हे प्रमाण आता वर्षाला १८ पर्यंत आले आहे. गेल्या तीन वर्षात औरंगाबादसह बीड, जालना येथून ४८ देहदान झाले. रासायनिक प्रक्रियेनंतर हे मृतदेह अनेक वर्षे वैद्यकीय शिक्षणात महत्वाची भूमिका बजावतात. 
 
पाच वर्षाच्या चिमुकल्याचे देहदान
मोठ्या व्यक्तींचे देहदान नियमित होतात. परंतु लहान मुलांचे देहदान क्वचितच घडते. 
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पाचवर्षीय चिमुकल्याचे देहदान वैद्यकीय इतिहासात आणि वैद्यकीय शिक्षणासाठी, संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले.  पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून डॉक्टर असलेल्या माता-पित्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) त्याचे देहदान करीत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.
 
अवयवदानाची चळवळ
अवयवदानासाठी पारंपरिक मृत्यूची व्याख्या बदलून ‘ब्रेन डेड’ ही व्याख्या कायद्याने संमत केली आहे. यामध्ये रुग्णाचा मेंदू कार्यरत नसेल तर त्याला मृत घोषित करून कुटुंबियांच्या परवानगीने त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतात. औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी राम मगर या ब्रेन डेड तरुणाच्या अवयवदाने तिघांना नवे आयुष्य मिळाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीने वेग पकडला. गेल्या दीड वर्षात १२ अवयवदान झाले. यातून 24 किडन्या, 11 यकृत, 7 हृदयाचे प्रत्यारोपण झाले. तसेच नेत्रदानही झाले. या अवयवदानामुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेले.
 
कुटुंबियांचा सत्कार करणार ...
देहदानात वाढ झाली असून गेल्या तीन वर्षात ४८ देहदान झाले. वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करणाºयांच्या कुटुंबियांचा शरीररचनाशास्त्र विभागातर्फे आॅगस्ट महिन्यात सत्कार करण्यात येणार आहे. 
-डॉ. शिवाजी सुक्रे,उपअधिष्ठाता तथा विभागप्रमुख,शरीररचनाशास्त्र, घाटी
 
आणखी जनजागृती वाढावी...
अवयवदान ब-यापैकी होत आहे. अवयवदानाविषयी आणखी जनजागृती वाढण्याची गरज आहे. त्यासाठी रुग्णालयांनी पुढाकार घेतला पाहिजे.
-डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी