शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भातील 5149 गावांना होणार फायदा; राज्याला मिळणार 2800 कोटी रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 20:01 IST

विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील 5149 गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’चा अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करण्यात आला.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर जागतिक बॅंकेसोबत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील 5149 गावांमध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पा’चा अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करण्यात आला.  नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर जागतिक बॅंकेसोबत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन प्रकल्पाबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, असे कृषि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी सांगितले.

राज्याच्या मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हवामानावर आधारीत शेती करताना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवितानाच सहभागी गावातील जमीनीचे मृदसंधारण करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात विदर्भ आणि मराठवाड्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील सहा वर्ष हा प्रकल्प राबविण्यात येईल.

या प्रकल्पासाठीच्या कर्जविषयक करार मसुदा तसेच प्रकल्प अंमलबजावणी मसुद्यास आज नवी दिल्ली येथे जागतिक बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्यावतीने वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आर.ए. राजीव, कृषि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, प्रकल्प संचालक विकास रस्तोगी उपस्थित होते. या बैठकीत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जागतिक बॅंकेच्या मुख्यालयातील अधिकारी सहभागी झाले होते. त्यांच्याकडून करारनाम्याचा मसुदा अंतिम झाल्यानंतर केंद्र शासनाचे वित्त विभागाचे अधिकारी, श्री. विजयकुमार यांनी जागतिक बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

27 फेब्रुवारी रोजी जागतिक बॅंकेच्या कार्यकारी संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यात या कराराबाबत औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याला सुमारे 2800 कोटी रुपयांची मदत जागतिक बॅंकेकडून मिळणार आहे. साधारणात मार्चपासून प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होईल, असे श्री. विजयकुमार यांनी सांगितले.

26 जानेवारी रोजी ग्रामसभांमधून प्रकल्पात समावेश असलेल्या गावामध्ये जनप्रबोधनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कृषि विभागाच्या प्रधान सचिवांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र