शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात आठ महिन्यांत 580 शेतकरी आत्महत्या, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 17:35 IST

मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देअनियमित आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने शेती तोट्यात गेली6 ते 13 ऑगस्ट दरम्यान तब्बल 34 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावर्षी पावसाळ्याचे दोन सव्वा दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळी ढग दाटून आले आहे

औरंगाबाद, दि. 16 : सरकारच्या कर्जमाफीनंतंर शेतक-यांचे प्रश्न आता तरी सुटतील अशी अपेक्षा होती. पण मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरदिवशी सरासरी तीन - चार शेतकरी आपली जिवनयात्रा संपवतात.  

दोन वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.  प्रत्येकवर्षी पडणाऱ्या अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी पावसामुळे शेती तोट्यात जात आहे. मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या घडल्याचं समोर आलं आहे. एकट्या बीडमध्येच 107 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.  यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारविरोधात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. सर्वसामान्या लोकांच्यामते सरकारनं शेती समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. मराठवाड्या सारख्या भागात कमी पाऊस पडतो हे जगजाहीर असताना सरकरनं केलेल्या उपायोजनाचा कोणताच फायदा का होत नाही. सरकारनं जलयुक्त शिवारसारख्या योजना यशस्वी केल्याचा दावा केला आहे. तर मग आत्महत्या का थांबायला तयार नाहीत. असा प्रश्न सर्वसामान्या जनतेतून विचारला जात आहे. 

गेल्या तीन ते चार वर्षापासून मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतक-यांवर मोठे संकट होते. याकाळात बँका, सावकाराकडून घेतलेल्या कर्जात मोठी भर पडत गेली. राज्य सरकारने शेतक-यांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केल्याने अनेक शेतकठयांना मोठा दिलासा मिळाला. परंतू पावसाच्या अवकृपेने हजारो हेक्टर जमिनीवर घेतलेल्या पिकांचे पाण्याअभावी योग्य वाढ होत नसल्याने अपेक्षित उत्पन मिळणार नाही. असा प्रश्न सतत शेतक-यांना भेडसावत आहे. मराठवाड्यात सतत पडणा-या दुष्काळाने शेतकरी आत्महत्या प्रमाण प्रत्येक वर्षी वाढतच असून सरकारने केलेले प्रयत्न फोल ठरत असल्याचे दिसत आहे. जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत मराठवडा महसूल विभागात प्राप्त झालेल्या आकडेवारी नुसार 531 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती होती. तोच आकडा ऑगस्ट महिन्याच्या 13 तारखे पर्यंत तब्बल 580 पर्यंत पोहचला तर 6 ते 13 ऑगस्ट या सात दिवसाच्या काळात 34 शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या तेरा दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात 5, बीड जिल्ह्यात 12, नांदेड 9, परभणी 7, जालना 6, लातूर 5, उस्मानाबाद 4 तर हिंगोलीत एका शेतक-याने आत्महत्या केल्याची नोंद घेण्यात आली आहे. 

तीन वर्षापूर्वी तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतक-यांना उत्पन्न मिळाले नाही. मागील वर्षी ब-यापैकी पाऊस झाल्याने येथील कृषीक्षेत्रात समाधानाचे वातावरण असले तरी नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतक-यांच्या होणा-या आत्महत्या थांबल्या नसल्याचे दिसत आहे.  यावर्षी पावसाळ्याचे दोन सव्वा दोन महिने उलटले तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने पुन्हा एकदा दुष्काळी ढग दाटून आले आहेत. त्यामुळे निराशेतून शेतकरी आत्महत्या करण्याचा टोकाचा मार्ग पत्करतो आहे. 

आणखी वाचा : कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या अन् आंदोलने

मराठवाडा विभागातील शेतकरी आत्महत्येची प्रकरणे