डोंबिवली : फेसबुकवर मराठी भाषेची सुविधा उपलब्ध होऊन काही महिनेच झाले आहेत. त्यापाठोपाठ आता न्यूज फीड व स्टॅम्प अॅड या आॅप्शनवरही मराठीची सुविधा उपलब्ध होणार आहे. डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात फेसबुक आॅफ इंडियाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. सोशल कनेक्ट मीडिया या कंपनीचे सीईओ सचिन केळकर यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)
फेसबुकच्या ‘न्यूज फीड’, ‘स्टॅम्प अॅड’वरही झळकणार मराठी
By admin | Updated: January 16, 2015 06:31 IST