शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:01 IST

हिंदी भाषेला विरोध दुर्दैवी घटना आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या शाळांमध्ये जर शासनाकडून मोफत हिंदी शिकवले जाणार होते मग त्यात बिघडले काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

अहिल्यानगर - जे हिंदी भाषेला विरोध करतात ते ऊर्दू भाषेला करत नाही. ऊर्दू भाषा शिकवली जाते, त्याला शासन अनुदान देते, संस्था देते त्याला विरोध न करता हिंदी भाषेला विरोध कशासाठी? हिंदी भाषेला मान्यता दिलीच पाहिजे. सीबीएसई बोर्ड ग्रामीण भागापर्यंत पोहचवण्यासाठी शासन विचाराधीन होते. मग हे मोफत हिंदी शिकवत असतील तर त्यात गैर काय? असा सवाल करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी हिंदी भाषा सक्तीचे समर्थन केले आहे.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आज इतकी स्पर्धा वाढली आहे त्यात मुलांना सक्षम केले तर ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. त्यात आत्मनिर्भर गाव, आत्मनिर्भर तालुका, आत्मनिर्भर जिल्हा, आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर देश उभा राहू शकतो. त्यामुळे भाषा ज्ञानात भर टाकणाऱ्या आहेत. या भाषा शिकल्या पाहिजे. मतांसाठी हिंदीला जे विरोध करतात त्यांनी कुठल्या भाषेला आपण विरोध करतोय आणि कुठल्या भाषेचे मूक समर्थन करतोय याचाही विचार करणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हिंदी भाषेला विरोध दुर्दैवी घटना आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या शाळांमध्ये जर शासनाकडून मोफत हिंदी शिकवले जाणार होते मग त्यात बिघडले काय? आज ग्रामीण भागातील कुणी वेगळ्या राज्यात गेला किंवा मुंबई-पुण्यासारख्या शहरात गेला..आज आमच्याकडील बरीच लोक सूरतमध्ये व्यवसाय करतात तिथे प्रस्थापित झाली आहेत, तिथे मराठी कुणाला समजत नाही. जरी मनुष्य इतर कुठेही गेला नसेल तरी शिक्षण मोफत दिले जात असेल तर त्यात बिघडते काय असा सवाल आमदार संग्राम जगताप यांनी विचारला आहे.

दरम्यान, ज्या भारताच्या भाषाच नाहीत त्या शिकण्यासाठी शासन मान्यता देत आहे ते दुदैव आहे. हिंदी भाषेला कुणी राजकारणासाठी विरोध करत असेल तर ते बरोबर नाही. आज अनेक लोक जर्मन, चायनीज, फ्रान्स भाषेचे क्लास घेतात त्यावर उदरनिर्वाह चालतो. हिंदी भाषा दक्षिण भारत वगळता देशात सगळीकडे बोलली जाते. आमचा शेतकरी बांधव वेगळ्या राज्यात गेला तर तिथे तो भाव करू शकतो, तिथे संवाद साधू शकतो. त्यामुळे हिंदी भाषा ही भारताबाहेरची भाषा नाही. ती मोफत शिकायला मिळत असेल तर राज्याने शिकवावी. ज्याला शिकायची असेल तो शिकेल ज्याला नाही शिकायची तो शिकणार नाही असंही आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं.  

टॅग्स :Sangram Jagtapआ. संग्राम जगतापhindiहिंदीmarathiमराठीNCPराष्ट्रवादी काँग्रेस