शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

मराठी टॅलेंटला माध्यमाची गरज!

By admin | Updated: November 20, 2014 02:51 IST

मराठीमध्ये अनेक चांगले विषय सलगपणे येत आहेत. यावरून मराठीमध्ये किती टॅलेंट भरलेले आहे, याची जाणीव होते. मात्र ही कला लोकांपर्यंत पोहचण्यासाठीचे योग्य माध्यम मिळत नाही.

पुणे : मराठीमध्ये अनेक चांगले विषय सलगपणे येत आहेत. यावरून मराठीमध्ये किती टॅलेंट भरलेले आहे, याची जाणीव होते. मात्र ही कला लोकांपर्यंत पोहचण्यासाठीचे योग्य माध्यम मिळत नाही. मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित होतात मात्र सामान्य माणसाला ती वेळ ‘आॅड’ ठरते. मराठीला प्राईम टाईम मिळाला तरच तो चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यत पोहचेल. याबाबत कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत अभिनेता अजय देवगण याने व्यक्त केली. अजय आता मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये उतरला आहे. ‘विटी-दांडू’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी पुण्यात आला असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अभिनेते रविंद्र मंकणी, अशोक समर्थ, दिग्दर्शक विकास कदम उपस्थित होते. अजय म्हणाला, मराठीमध्ये दर्जेदार कथानक येत असल्यानेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंत मराठीमध्ये येण्यास इच्छुक आहेत किंवा निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. बॉलिवूडचे सिनेमे हे केवळ मनोरंजनात्मक असतात, नाहीतर मग थेट कलात्मक असतात. मात्र मराठीमध्ये या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घातल्याचे दिसते. मराठी आणि हिंदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेन्ट आहे, ते एकमेकांना पूरक ठरेल, अशा पद्धतीने काही प्रोजेक्टस भविष्यातही मला करायला आवडतील. मराठीमध्ये मला एकट्याला किंवा काजोलसह काम करायला आवडेल, मात्र तसे कथानक असायला हवे.‘विटी दांडू’विषयी अजय म्हणाला, या चित्रपटाचा लेखक विकास कदम आणि मी एकत्र काम करीत आहेत. विकासने ‘विटी दांडू’ची कथा लिहिल्यानंतर मला ऐकवली आणि त्या कथेच्या मी प्रेमातच पडलो. मराठीत पदार्पण करण्यासाठी यापेक्षा दर्जेदार दुसरी कथा होऊच शकत नाही, असा विचार मनात आला आणि मी तेव्हाच या चित्रपटाचा अविभाज्य घटक होण्याचा निर्णय घेतला.