शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘हुसैनीवाला’शी जुळले आहे मराठी नाते; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 06:15 IST

हुसैनीवाला या गावातील सतलज नदीच्या काठावर शहीद भगतसिंग, शिवराम राजगुरू व सुखदेव यांच्यावर २३ मार्च १९३१ राेजी अंत्यसंस्कार करण्यात आले हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवरील सतलज नदीच्या काठावर वसलेल्या हुसैनीवाला या गावाशी मराठी नाते जु्ळलेले आहे. हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांच्या राेषाला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना सामाेरे जावे लागल्याने हे चिमुकले गाव प्रसिद्धीस आले आहे.

हुसैनीवाला या गावातील सतलज नदीच्या काठावर शहीद भगतसिंग, शिवराम राजगुरू व सुखदेव यांच्यावर २३ मार्च १९३१ राेजी अंत्यसंस्कार करण्यात आले हाेते. भारतमातेच्या या वीरांचा यथाेचित गाैरव करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय शहीद स्मारक उभारले आहे. यालाच हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारक म्हटले जाते. 

शहीद भगतसिंग व सुखदेव यांच्यासाेबत शिवराम राजगुरू या मराठी मातीत जन्मलेल्या क्रांतिकारकाला २३ मार्च १९३१ राेजी इंग्रजांनी लाहाेरच्या कारागृहात फाशी दिली.  लाहाेरमधील लाेकांचा राेष वाढेल यामुळे इंग्रजांनी जेलच्या मागच्या भिंतीला भगदाड पाडून मागच्या दाराने या तिन्ही वीरांचे मृतदेह हुसैनीवाला येथे आणले. तेथेच सतलज नदीच्या काठावर अंत्यत गुप्तपणे अंत्यसंस्कार उरकलेे. देशाच्या विभाजनानंतर मात्र हे गाव पाकिस्तानच्या ताब्यात गेले.  तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेऊन हे गाव १९६१ मध्ये भारतात सामील केले.