शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा अभिजातच; प्रमाणपत्राची गरज नाही; प्राचार्य डॉ. कौतिकराव ठाले यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 07:46 IST

मुकुंदराज, महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांनी सर्वोत्तम काव्यच नव्हे, तर नवे मूल्य, जाणिवा दिल्या. मराठवाड्यातील याच लेखक, कवी, विचारवंतांनी महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला, असेही ठाले-पाटील यावेळी म्हणाले.

नांदेड : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळेल ठाऊक नाही; पण मराठी भाषा ही अभिजात आहेच. तिला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, तर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. अच्युत बन, उपजिल्हाधिकारी विकास माने, स्नेहलता स्वामी, संयोजक डॉ. पृथ्वीराज तौर आदी उपस्थित होते.मराठी वाङ्मयाच्या आठशे वर्षांच्या इतिहासातील सुरुवातीची चारशे वर्षे मराठवाड्यातच साहित्यनिर्मिती झाली. मुकुंदराज, महदंबा, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ या सर्वांनी सर्वोत्तम काव्यच नव्हे, तर नवे मूल्य, जाणिवा दिल्या. मराठवाड्यातील याच लेखक, कवी, विचारवंतांनी महाराष्ट्राच्या वाङ्मयाचा इतिहास समृद्ध केला, असेही ठाले-पाटील यावेळी म्हणाले.यावेळी प्रो. हिरायान्ना यांच्या ‘कलानुभव’ या पुस्तकाचे डॉ. शैलजा वाडीकर यांनी भाषांतर केलेले पुस्तक, डॉ. अच्युत बन लिखित ‘माझ्या आयुष्याची स्मरणगाथा’, स्नेहलता स्वामी लिखित कादंबरी ‘गांधारी’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.