शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 14:12 IST

गुरुवारी सकाळी १० वाजता कर्करोगाशी लढता लढता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते.

ठळक मुद्देमराठी शुद्धलेखनतज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे कर्करोगामुळे आज १४ मे रोजी नाशिक येथे निधन झाले. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता कर्करोगाशी लढता लढता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आहे.

ठाणे : मराठी शुद्धलेखनतज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांचे कर्करोगामुळे आज १४ मे रोजी नाशिक येथे निधन झाले. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता कर्करोगाशी लढता लढता वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली चार वर्षे ते नाशिकला मुक्कामी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून आहे.अरुण फडके यांच्या जाण्यामुळे मराठी भाषेची मोठी हानी झाली असून मराठी भाषेवर अपरिमित प्रेम करणारे गुरुवर्य गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या छोट्या पुस्तिकेपासून समग्र मराठी लेखन-कोशापर्यंत विविध प्रकारची पुस्तके त्यांनी लिहिली होती. 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेले ऍपही लोकांना खूप उपयुक्त ठरते आहे. 

पुस्तकलेखनाबरोबरच शुद्धलेखन कार्यशाळांच्या माध्यमातूनही ते मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी लोकांना जागरूक करण्याचे कार्य करत होते. गेली काही वर्षे कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांचे कार्य सुरूच होते. वडिलोपार्जित मुद्रण व्यवसायात असलेले फडके सुरुवातीला व्यवसायाची गरज म्हणून मुद्रितशोधन करू लागले. भाषेची आवड त्यांना पूर्वीपासून होतीच. त्यातूनच त्यांनी पुढे मराठी शुद्धलेखन या विषयाला वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली पुस्तके म्हणजे मराठी भाषेसाठी एक अमूल्य ठेवा आहे. ते मूळचे ठाण्याचे होते. आज मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारे लोक बरेच असले, तरी ती शुद्ध (नियमानुसार) लिहिणारे किंवा तशा प्रकारे वापरणारे, वापरण्याची इच्छा असणारे लोक फारच कमी आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस कमीच होत जाते आहे. अशा परिस्थितीत अशा जाणकार, पथदर्शक आणि भाषेच्या सुयोग्य वापरासाठी झटणाऱ्या व्यक्तीचे जाणे खूप मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus : ...तर कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही, WHOने दिला गंभीर इशारा

वाद पेटला! चीनची दक्षिण चिनी समुद्रातील 'त्या' भागावर ताबा घेण्याची धमकी; तैवान करणार युद्धाभ्यास

दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान