शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मराठी विश्वकोश होणार अद्ययावत

By admin | Updated: June 1, 2016 00:36 IST

विश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने त्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद

नम्रता फडणीस,  पुणेविश्वकोशातील नोंदी कालबाह्य झाल्याने त्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मानव्य शाखांमधील नवीन संकल्पना, विचारप्रवाह या सर्व बदलांची नोंद घेण्यासाठी विश्वकोश अद्ययावत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात २० ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे.सद्य:स्थितीत मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांपैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना, विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखांतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्याचा विचार शासनस्तरावर सुरू होता. हे अद्ययावतीकरण करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून माहिती व तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व ज्ञानक्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करून त्याचे समीक्षण-संपादन करून अंतिम नोंद करणे आवश्यक वाटत असल्याने विविध विषयांशी संबंधित ज्ञान मंडळे स्थापन करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. त्यानुसार विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्थांशी चर्चा केल्यानंतर पहिल्या टप्प्यात २० ज्ञान मंडळे स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानुसार मुंबई येथे १२ (आयसीटी आणि मराठी विज्ञान परिषद), पुणे ४ (डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ-३ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर-१), जळगाव २, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर १, नाशिक १ अशा ठिकाणी २० ज्ञान मंडळे स्थापन करण्यासंबंधी संबंधित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करार झाले आहेत. पुणे विद्यापीठ, एसएनडीटी, नांदेड विद्यापीठाशी ज्ञान मंडळ निर्मित करण्यासंबंधी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक ज्ञान मंडळाकडे सोपविण्यात आलेल्या विषयाची व्याप्ती व मर्यादा ठरवून विश्वकोशाच्या १ ते २० खंडांमधील शब्दांची नव्याने नोंद यादी तयार करणे, या नोंदयादीची जुन्या नोंदयादीशी पडताळणी करणे आणि नव्याने समाविष्ट करण्याच्या नोंदी, कालबाह्य नोंदी व अद्ययावत करायच्या नोंदी यांचा अहवाल तयार करणे तसेच ज्ञान मंडळातील तज्ज्ञांच्या साह्याने नोंदीचे लेखन, समीक्षण-संपादन व भाषांतर करणे, विश्वकोशातील नोंदींच्या लेखनासाठी लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे आणि नोंदींचे लेखन करणाऱ्या तज्ज्ञांनी दिलेले नोंदींचे संदर्भ, त्यासंबंधीची चित्रे, रेखाचित्रे, नकाशे, आराखडे, आॅडियो-व्हिज्युअल यांची पडताळणी व संपादन करणे या गोष्टी ज्ञान मंडळामार्फत केल्या जाणार आहेत. यामध्ये विश्वकोश मंडळावरील सदस्यांवर पालक म्हणून विशिष्ट विषयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच संबंधित विद्यापीठ, शैक्षणिक व संशोधन संस्था येथील मराठीतून संशोधनात्मक लेखन करण्याचा अनुभव असलेले विषयतज्ज्ञ, सेवानिवृत्त विषयतज्ज्ञ, संशोधक विद्यार्थी यांना समन्वयक म्हणून नेमले जाणार आहे.