शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

मुंबईतील बिहारींनी मराठी शिकलेच पाहिजे!

By यदू जोशी | Updated: April 13, 2018 06:58 IST

मुंबईत रोजीरोटीसाठी राहत असलेल्या बिहारी बांधवांनी येथील समाजाशी नाळ जोडण्यासाठी आणि इथल्या मातीशी समरस होण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे आग्रही मत मांडत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थनच केले आहे.

मुंबई : मुंबईत रोजीरोटीसाठी राहत असलेल्या बिहारी बांधवांनी येथील समाजाशी नाळ जोडण्यासाठी आणि इथल्या मातीशी समरस होण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे आग्रही मत मांडत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थनच केले आहे.बिहार दिनानिमित्त आयोजित समारंभ आणि गुंतवणूक परिषदेसाठी मोदी मुंबईत आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न : उदरनिर्वाहासाठी मुंबईत राहणारे बिहारी लोक इथल्या समाजाशी एकरूप झालेत असे आपल्याला वाटते का?मोदी : मुंबईच्या विकासात बिहारी, उत्तर प्रदेशींसह अन्य हिंदी भाषिकांचेही योगदान आहे. बिहारी माणूस मेहनती आहे. पण इथे राहत असताना इथल्या मातीशी त्याने एकरूप झाले पाहिजे, मराठी भाषाही शिकली पाहिजे. संवादाची भाषा एक असेल तर परकेपणा जाणवणार नाही. शिवाय, कटुता वा गैरसमज असतील तर ते दूर होतील.प्रश्न : मुंबईवरील बिहारींचे अवलंबित्व कमी करू, असे आपले मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले होते. मुंबईतील बिहारी माणसांचे लोंढे कमी करण्यात आपल्याला यश आले आहे का?मोदी : ते अवलंबित्व पूर्णत: संपविणे शक्य नाही, पण उदरनिर्वाहासाठी मुंबईत येणाऱ्या बिहारींचे प्रमाण आज फारच कमी झाले आहे. आज जे बिहारी इकडे येतात ते चांगला व्यवसाय आणि जीवनमान उंचावण्यासाठी. हा गुणात्मक बदल आज दिसून येतो. मोलमजुरी करणारा बिहारी माणूस मुंबईत खचितच दिसेल.प्रश्न : मुंबईतील बिहारींंसाठी आपले सरकार काही करतेय का?मोदी : आमच्या सरकारने बिहार फाऊंडेशनचे कार्यालय मुंबईत सुरू केले आहे. मुंबईत ‘टाटा कॅन्सर’मध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णास एक लाखाची मदत आमचे सरकार करते. या रुग्णांच्या निवासाची समस्या सुटावी म्हणून एखादी जागा वा इमारत महाराष्ट्र सरकारने द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. बिहारबाहेर दुर्घटनेत बिहारी व्यक्ती दगावली तर तिच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत तत्काळ दिली जाते.प्रश्न : बिहार म्हटले की गुंडागर्दी असेच चित्र समोर येते. आपल्या सरकारला हे चित्र कितपत बदलता आले?मोदी : आजवर बिहारी माणसाला स्वत:ला बिहारी म्हणवून घेण्यात लाज वाटत असे. पण आज अभिमान वाटतो. हा बदल आम्ही करू शकलो. गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने फारच कमी झाले आहे. आम्ही विकासाचा अजेंडा राबवित आहोत. बिहारच्या कोणत्याही कोपºयातून पाच तासात राजधानी पाटण्याला पोहोचता येईल असे रस्ते आम्ही बांधले.>दारूबंदीच्या निर्णयाचा फायदा झाला का?मोदी : निश्चितच झाला. आमच्या राज्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे तेही एक कारण आहे. इतर राज्यांनी पण आमच्यासारखी १०० टक्के दारूबंदी करायला हवी. राज्यातील जनतेच्या स्वास्थ्यासमोर दारूपासून मिळणारे उत्पन्न गौण आहे.>शत्रुघ्न सिन्हांना स्वत:बद्दल गैरसमजयशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोन भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सूर आळवण्यात आघाडीवर असतात. याबद्दल आपल्याला काय वाटते, असे विचारले असता मोदी म्हणाले, शत्रुघ्न सिन्हांना स्वत:बद्दल फार मोठे गैरसमज आहेत. आपल्या लोकप्रियतेवर आपण निवडून आलो असे त्यांना वाटते. नरेंद्र मोदींची लाट आणि भाजपाच्या ताकदीमुळे ते लोकसभेवर गेले. कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात ते छिद्र करीत आहेत. केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते ‘भडास’ काढत आहेत.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारBiharबिहार