शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Marathi Bhasha Din : ऑस्ट्रेलियात मुरलेला महाराष्ट्र अन् मराठी ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 09:11 IST

ऑस्ट्रेलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात कांगारू, लांबवर समुद्रात असणारा मोठा भूखंड आणि फारतर क्रिकेट. पण 70 च्या दशकामध्ये अनोळखी दूरवर असणाऱ्या या खंडावर मराठी लोकांचंही आगमन झालं.

- निम घोलकर

ऑस्ट्रेलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात कांगारू, लांबवर समुद्रात असणारा मोठा भूखंड आणि फारतर क्रिकेट. पण 70 च्या दशकामध्ये अनोळखी दूरवर असणाऱ्या या खंडावर मराठी लोकांचंही आगमन झालं. सुमारे 2.4 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये आज 20 हजार मराठी लोकांचा समुदाय सुखेनैव नांदत आहे. मायभूमीपासून, मराठी भाषेपासून इतक्या दूर राहत असलो तरी आमच्या या मराठी बांधवांमधलं मराठीपण आजिबात संपलेलं नाही. मराठी माणूस महाराष्ट्राची सीमा उल्लंघून बाहेर जाऊ शकतो पण त्याच्यामध्ये मुरलेला 'महाराष्ट्र' काढून घेता येत नाही. आमचंही तसंच आहे.

मराठी बांधवांनी एकत्र येऊन प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये मराठी मंडळांची स्थापना केलेली आहे. तसेच त्यांचे फेसबुकवर ग्रूपही आहेत. सिडनी आणि मेलबर्नमध्ये मराठी रेडिओ स्टेशन्सही आहेत. ही सगळी मंडळं गणपती, दिवाळी, मकर संक्रांत असे सण साजरे करतात. या सणांमध्ये लोकांचा उत्साह थेट महाराष्ट्रासारखाच असतो. ढोल ताशांचा निनाद आणि लेझीमचा नाद अगदी तसाच कानावर येतो. वटपौर्णिमा, मंगळागौर असे खास सण आम्ही महिला साजरे करतो. यावेळेस हळदीकुंकूही होतं, अगदी नऊवार पातळं, पैठण्या नेसून आणि नथ वगैरे सगळे मराठमोळे दागिने लेवून.

मराठी सांस्कृतिक जगतामध्ये काय चाललंय याची आम्हाला उत्सुकता असतेच. आता मराठी सिनेमा ज्या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित होतात त्याच दिवशी येथेही मल्टिप्लेक्स सिनेमागृहात प्रदर्शित होतात. तसेच अनेक मराठी कलाकारांच्या तसेच गायकांच्या मैफली, नाटकंही येथे होतात. त्यामुळे इतकी वर्षे टीव्हीच्या पडद्यावर पाहिलेल्या आपल्या आवडत्या कलाकारांना जवळून पाहण्याची संधी आम्हाला मिळते. ऑस्ट्रेलियात राहाणारे मराठी लोक माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, संशोधन, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करून समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल काही मराठी लोकांना 'ऑस्ट्रेलिया डे' पुरस्कारही (आपल्या पद्म पुरस्काराच्या समकक्ष) मिळालेला आहे.  काही मराठी लोकांनी व्यवसायातही नाव कमावले आहे. मराठी महिलाही उद्योगक्षेत्रात आता पुढे येत आहेत. मायभूपासून दूर आल्यानंतर मातृभाषा कानावर पडणं कमी होत जातं, पण आम्ही सगळे भेटल्यावर मराठीत बोलण्याचा आवर्जून प्रयत्न करतो.

आपली भाषा पुढच्या पिढीला शिकवण्याचा प्रयत्न सुरू असतोच. आताची इथली मराठी पिढी खरंच नशीबवान आहे. आठवड्याच्या शेवटी मराठी शिकण्याचे तास असल्यामुळे त्यांना मराठी भाषा शिकता येते. माझी तिन्ही मुले सिडनीमध्येच मोठी होत आहेत. आम्ही घरात मराठीच बोलतो आणि माझ्या मुलांनाही मराठीची माझ्याइतकीच ओढ आहे. पिझ्झा-पास्ता असे परदेशी पदार्थ चाखताना वरणभाताची चव विसरता येत नाही आणि वरणभाताच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला येत नाही यावर आमच्या सगळ्यांचं एकमत आहे.

(निम घोलकर या सिडनी येथे राहतात. गेली अनेक वर्षे सक्सेस कोच म्हणून कार्यरत. त्यांनी दोन पुस्तकांचे लेखनही केले आहे.)

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018