शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सैनिक तैनात असतो, तिथला शत्रू घाबरतो; लष्करप्रमुखांची स्तुतिसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 07:10 IST

कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.

कोल्हापूर : मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जेथे मराठा सैनिक तैनात असतो, तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) येथे बुधवारी भारतीय सेनेतर्फे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरात आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.रावत म्हणाले, मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास मोठा आहे. या इन्फंट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली आहेत. रणभूमीवरील इतिहासात असे एकही युद्ध नाही, जिथे ११४ मराठा रेजिमेंट लढला नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी विजय मिळवूनच मराठा सैनिक परततात.पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता आल्यामुळे भारतीय सैन्यदलाच्या धोरणांत काही विशेष बदल केला आहे काय, यावर रावत म्हणाले, सत्ता कोणाचीही व कोणतीही असली तरीही अतिरेकी त्यांच्या कारवाईत सतत बदल करत असतात. त्यानुसार आम्हीही सतत आमचीही व्हूहरचना बदलतो. अतिरेक्यांकडून ‘स्नायपर’ बंदुकीचा वापर झाल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही तरीही आपल्याकडील एके-४७ सह अन्य अत्याधुनिक कॅमेरे असलेल्या बंदुकांसह आपण त्यांचा सामना करू शकतो.नक्षल्यांचे हल्ले वैफल्यातूनसततच्या कारवायांमुळेच नक्षली हतबल झाले आहेत. त्यांच्याकडून प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले वैफल्यातून होत असून केंद्रीय सशस्त्र दल तसेच निमलष्करी दल नक्षलींचा सामना करण्यास सक्षम आहेत, असेही लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले.तसेच या वेळी त्यांनी माजी सैनिक, अधिकारी, वीरमाता व वीरपत्नी यांची आपुलकीने चौकशी केली तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत, प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचनाही दिल्या.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवान