शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 16:18 IST

मराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं, असं राणे म्हणाले आहेत.

ठळक मुद्देमराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे.आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं, असं राणे म्हणाले आहेत. कलम 16, 17 मध्ये बसणारं  आणि कायद्यात टिकणारं आरक्षण सरकारनं द्यावं

मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. आम्ही आरक्षण दिलं होतं, भाजपा सरकारनं काढून घेतलं, असं राणे म्हणाले आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत राणेंनी याचा खुलासा केला आहे. आम्ही आरक्षण दिलं होतं, त्यानंतर त्यावर राजकारण झालं आणि काही लोक या आरक्षणाविरोधात न्यायालयात गेले. न्यायालयात जाणाऱ्या त्या लोकांची चौकशी करायला पाहिजे. योग्य वेळी त्या लोकांची नावे सांगेन.मी  भाजपामध्ये प्रवेश केलेला नाही. फक्त भाजपाच्या समर्थनानं राज्यसभेवर गेलो आहे. सत्ताधाऱ्यांनी पेच निर्माण केल्यानंच आरक्षण रखडल्याचा पुनरुच्चारही नारायण राणेंनी केला आहे. कायद्यात बसेल असं आरक्षण दिलं होतं आणि ते सुरूही झालेलं होतं. आमच्या अहवालात फक्त मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं. राणे म्हणाले, राज्य सरकारनं आरक्षण द्यावं, अशी मागणी आम्ही केली होती. सगळे घटनात्मक पेच सोडवता येतात, राणे समितीनं यावर अभ्यास केला आहे. मराठ्यांचा सामाजिक, आर्थिक सर्व्हे केल्यानंतर राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार मिळतो. त्याप्रमाणे अधिकारांचा वापर करून ते आरक्षण देऊ शकतात. अहवाल येण्याआधी वाद निर्माण करणं योग्य नाही, अहवालातील शिफारशीनंतर मी बोलेन,  तांत्रिकदृष्ट्या अहवालात मराठा आणि कुणबी दोघांना बसवलं आहे का हे पाहावे लागेल. त्यानंतर अहवालावर बोलेन, असंही राणेंनी स्पष्ट केलं आहे.अहवालातून आरक्षणाला पोषक शिफारशी येतील, अशी आशा आहे. कलम 16, 17 मध्ये बसणारं  आणि कायद्यात टिकणारं आरक्षण सरकारनं द्यावं, असंही राणे म्हणाले आहेत. आम्ही 18 लाख कुटुंबाचा, तर यांनी 45 लाख कुटुंबाचा सर्व्हे केला होता. राज्य मागासवर्ग आयोगाकडे आम्ही अहवाल पाठवला. परंतु मागासवर्ग आयोगाकडून कोणताही अभिप्राय न आल्यानं आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. काँग्रेसला मराठ्यांना तीन टर्मममध्ये आरक्षण देणं का जमलं नाही हे मी सांगू शकत नाही. पण मला जेव्हा मराठा आरक्षणाची जबाबदारी दिली, ती मी चोख पार पाडली. मागासवर्ग आयोगाला राणे समितीनं डावललं नाही, असंही राणेंनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maratha Reservationमराठा आरक्षण