शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : बीडमधील त्या तरुणाची सुसाईड नोट बनावट, लिहिणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 18:50 IST

Maratha Reservation Marathi News: बीडमधील एका तरुणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून आत्महत्या केल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती.

मुंबई/बीड - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिल्यापासून मराठा समाजाकडन त्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, बीडमधील एका तरुणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून आत्महत्या केल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या आत्महत्येबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर तरुणाच्या मृत्यूचा गैरफायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाइड नोट लिहून ती व्हायरल करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार बीडमधील विवेक रहाडे नावाच्या १८ वर्षीय तरुणाने आथ्महत्या केली होती. त्यानंतर या तरुण्याच्या नावाने एक सुसाइड नोट लिहून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. महाठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्द्याशी संबंध जोडण्यात आल्याने या आत्महत्येवरून खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या सुसाइड नोटचा अभ्यास केला असता ती खोटी असल्याचे समोर आले. तीन नमुन्यांमधून या सुसाइड नोटमधील हस्ताक्षर तपासले असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे आले होते वृत्तमी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याचे वृत्त आले होते. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगण्यात येत होते.संभाजीराजे छत्रपतींनीही केले होते आवाहनकोल्हापूर: मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन केले होते.'विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!' अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी श्रद्धांजली वाहिली होती. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBeedबीडSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी